जिल्ह्यात वीकेण्ड लॉकडाऊनला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:18 IST2021-04-11T04:18:38+5:302021-04-11T04:18:38+5:30

बार्शीटाकळीत दुकाने बंद; बाजारपेठेत शुकशुकाट बार्शीटाकळी : जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा कहर वाढतच असून, दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाला ...

Mixed response to weekend lockdown in the district | जिल्ह्यात वीकेण्ड लॉकडाऊनला संमिश्र प्रतिसाद

जिल्ह्यात वीकेण्ड लॉकडाऊनला संमिश्र प्रतिसाद

बार्शीटाकळीत दुकाने बंद; बाजारपेठेत शुकशुकाट

बार्शीटाकळी : जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा कहर वाढतच असून, दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात दोन दिवस वीकेण्ड लॉकडाऊन घोषित करण्यात आले. या वीकेण्ड लॉकडाऊनला बार्शीटाकळी येथील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. वीकेण्ड लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी शहरातली प्रतिष्ठाने बंद होती.

तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेनच्या माध्यमातून राज्यात दोन दिवस वीकेण्ड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. येथील व्यापाऱ्यांनी पुढाकार घेत दुकाने बंद ठेवली. त्यामध्ये किराणा दुकाने, कापड दुकाने, स्वीट मार्ट, रेस्टाॅरंट, भाजी दुकाने, हार्डवेअर अशी सर्व प्रकारची प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. तसेच बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. शहरासह तालुक्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद होती. (फोटो)

Web Title: Mixed response to weekend lockdown in the district