अल्पसंख्यकबहुल नागरीवस्तीचा विकास होणार!

By Admin | Updated: March 3, 2015 23:40 IST2015-03-03T23:40:26+5:302015-03-03T23:40:26+5:30

दोन कोटीचा निधी : अकोला, बुलडाणा, अमरावती जिल्ह्यांचा समावेश.

Minority-wise urban development will happen! | अल्पसंख्यकबहुल नागरीवस्तीचा विकास होणार!

अल्पसंख्यकबहुल नागरीवस्तीचा विकास होणार!

खामगाव (जि. बुलडाणा) : राज्यातील अल्पसंख्यकबहुल नागरी वस्तीमध्ये क्षेत्रविकास कार्यक्रम राबविण्यासाठी दोन कोटी आठ लक्ष रुपये अनुदान वितरीत करण्यासाठी राज्य शासनाने २ मार्च रोजी मान्यता दिली आहे. यामुळे विदर्भातील अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यातील अल्पसंख्यक वस्तीमध्ये विविध विकास कामे मार्गी लागणार असल्याचे संकेत आहेत. राज्यातील अल्पसंख्यक वस्तींमध्ये विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी तसेच परिसराचा विकास करण्यासाठी राज्य शासनाकडून अनुदान वितरीत केले जाते. याअंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यातील अल्पसंख्यक वस्तीमध्ये नागरी सुविधा, कॉक्रीटीकरण, पेव्हींग ब्लॉक आणि स्मशान भूमी विकासाचा समावेश आहे. दरम्यान, सन २0१५-१६ या आर्थिक वर्षांसाठी दोन कोटी ८ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये अमरावती आणि अकोला महापालिका क्षेत्रातील विविध वस्तीसह बुलडाणा जिल्ह्यातील विविध गावांमध्ये विकास कामे केली जातील. *या ठिकाणी होणार विकास कामे अमरावती जिल्ह्यातील अमरावती महानगर पालिकेतंर्गत १९.९६ आणि चांदुर बाजार नगर पालिकेत ९.९६ लक्ष रुपयांची तर बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर, मेहकर, नांदुरा, लोणार, या नगर पालिकांमध्ये अनुक्रमे १0 लक्ष, ९.९९ लक्ष, ९.७६ लक्ष आणि दहा लक्ष रुपयांची विकास कामे करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर आणि तेल्हारा नगर पालिकेत अनुक्रमे ९.३८ व ९.९९ लक्ष रुपयांची विकास कामे करण्यात येणार आहेत.

Web Title: Minority-wise urban development will happen!