शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘मेडिकल’चे विद्यार्थी व पोलिस आमने-सामने!

By admin | Updated: October 18, 2014 01:02 IST

वाडेगाव येथील युवकाच्या मृत्यूनंतर राडा : शवविच्छेदन करण्यास डॉक्टरांचा नकार.

अकोला : वाडेगाव येथील एका २0 वर्षीय युवकाच्या मृत्यूप्रकरणाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर, विद्यार्थी आणि पोलिस शुक्रवारी आमने-सामने आले. योग्य उपचाराअभावी युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करून, युवकाच्या नातेवाइकांनी शिवीगाळ केल्यामुळे शवविच्छेदन करण्यास विद्यार्थी व डॉक्टरांनी नकार दिला. त्यामुळे प्रकरण चिघळल्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात चार तास धुडगूस घातला. अकोला पोलिसांच्या विरोधात नारेबाजी करून, विद्यार्थ्यांनी संपही पुकारला. या गोंधळात युवकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जवळपास दिवसभर पडून होता.वाडेगाव येथील रहिवासी, छायाचित्रकार नारायण सोनोने यांचा मुलगा अवी (२0) याने शुक्रवारी सकाळी विष प्राषण केले. अवीला तातडीने सवरेपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. रुग्णालयात भरती केले, तेव्हा अवी सुस्थितीत होता, तो त्याच्या मामाशी बोलतही होता. भरती केल्यानंतर अवीला डॉक्टरांनी सलाईन लावले; मात्र त्यानंतर कोणतेही उपचार केले नाही. अवीच्या नातलगांनी डॉक्टरांना उपचार करण्याची विनंती वारंवार केली; मात्र डॉक्टर लक्ष देत नसल्याचे पाहून, नातलग चिडले. याच मुद्यावर त्यांच्यात वादही झाले; परंतु वादविवादापेक्षा उपचार महत्त्वाचे असल्याने नातलगांनी अवीला तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये हलविले. तेथील डॉक्टरांनी अवीला मृत घोषित केल्यानंतर, त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवरेपचार रुग्णालयात आणण्यात आला. त्यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे १00 ते १५0 विद्यार्थी संपूर्ण तयारीतच होते. त्यांनी अवीचा मृतदेह आणलेले एम एच २८ बी ७३0८ क्रमांकाचे वाहन रुग्णालयात अडविले. त्यामुळे मृताचे नातेवाइक आणि डॉक्टर तसेच विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच, पोलिसांनी सवरेपचार रुग्णालय गाठले. पोलिसांनी डॉक्टरांना समजाविण्याचा प्रयत्न केला; मात्र डॉक्टरांनी पोलिसांशीही वाद घातला. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनी शवविच्छेदन करण्याची विनंती डॉक्टरांना केली; मात्र डॉक्टरांसह विद्यार्थ्यांनी आधी लाठीचार्ज करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांवर कारवाई करा आणि मगच शवविच्छेदन करू, अशी मागणी केली. दोषी पोलिस कर्मचार्‍यांवर गुन्हे दाखल केल्याशिवाय शवविच्छेदन न करण्याचा निर्णय डॉक्टर व विद्यार्थ्यांनी घेतला.