शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूरनजीक क्लबवर छापा

By admin | Updated: October 27, 2014 23:47 IST

रोख एक लाखासह दोन कार व १४ दुचाकी जप्त, ३४ जणांना अटक.

खामगाव (बुलडाणा): उपविभागीय पोलिस अधिकारी जी.श्रीधर यांच्या पथकाने मलकापूरनजीक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हॉटेल पिकनीकचे बाजूला क्लबवर आज रात्री छापा टाकला. या छाप्यादरम्यान जुगार खेळत असलेल्या ३४ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख १ लाख १५ हजार, दोन कार, १४ दुचाकी असा लाखोंचा ऐवज जप्त केला.मलकापूर शहरानजीक हॉटेल पिकनीकचे बाजूला पैशाच्या हार-जितवर जुगाराचा क्लब चालत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी जी.श्रीधर यांना मिळाली. या माहितीच्या आधारे आज २७ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास पथकातील उपविभागीय पोलिस अधिकारी जी.श्रीधर, सपोनि बनसोडे, पोलिस उपनिरीक्षक इम्रान इनामदार, पोहेकाँ गुलाबराव काळे, नापोकाँ गजानन बोरसे, पोकाँ संदीप टाकसाळ, अजित परसुवाले, मपोकाँ मिसाळ, दीपक जाधव आदींनी छापा टाकला. यावेळी जुगाराचा डाव सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे या पथकाने जुगार्‍यांकडून एक लाख १५ हजार रोख तसेच स्विप डिझायनर व इंडिका कार, १४ दुचाकी असा लाखोंचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी शंकर वाघ रा.मलकापूर या क्लब चालकासह जुगार खेळणार्‍या ३४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत मलकापूर पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.