शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
2
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
3
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
4
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
5
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
6
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
7
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
8
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
9
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
10
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
11
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
12
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
13
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
14
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
15
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
16
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
17
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
19
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
20
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा कनिष्ठ अभियंता गजाआड

By admin | Updated: June 20, 2014 00:45 IST

७00 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता नवलकिशोर टावरी यांना गुरुवारी अटक करण्यात आली.

अकोला - वीज जोडणी देण्यासाठी ७00 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता नवलकिशोर टावरी यांना गुरुवारी अटक करण्यात आली. २0१२ मध्ये सदर प्रकरणी एका खासगी लाईनमनला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात अभियंत्याचाही हात असल्याचे समोर आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. जुने शहरातील रहिवासी एका वीज ग्राहकाने नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी वीज तक्रार निवारण केंद्रात अर्ज सादर केला होता. वीज कनेक्शन देण्यासाठी या केंद्रातील कनिष्ठ अभियंता नवलकिशोर टावरी यांनी खासगी लाईनमन श्रीकृष्ण जानकीराव पांडव यांच्यामार्फत वीज ग्राहकाला ७00 रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी वीज ग्राहकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर श्रीकृष्ण पांडव यांना ७00 रुपयांची लाच घेताना २७ जून २0१२ रोजी अटक करण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर लाच मागण्यासाठी वापरण्यात आलेले सीमकार्ड आणि मोबाईल हा कनिष्ठ अभियंता टावरी यांचा असल्याचे समोर आले असून, या प्रकरणात टावरी दोषी असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नवलकिशोर टावरी यांना गुरुवारी अटक केली. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येईल.