शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरण हानीत लक्षणीय घट

By admin | Updated: October 18, 2014 23:41 IST

प्रभावी उपाययोजनांमुळे गळती ३५ टक्क्यांवरून १४ टक्क्यांवर!

काही तासांची प्रतीक्षा : कुणाच्या गळ्यात पडणार आमदारकीची माळवर्धा : मतदान झाल्यानंतर कोण निवडून येणार याची भाकिते वर्तविली जाऊ लागली. मतांची गणिते जुळविली गेली. मतदार राजाचा कौल प्रत्येकाकडून आपापल्यापरीने वर्तविण्याचा खटाटोप गत काही दिवसांपासून सुरू आहे. मतदारांनी नेमका कौल कुणाला दिला? सारी भाकिते खोटी ठरतील काय, हे आता काही तासांनीच कळणार आहे. याची उत्सुकता आता खऱ्या अर्थाने शिगेला पोहचली आहे.रविवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ होत आहे. वर्धा व देवळी मतदार संघाची मतमोजणी वर्धेत तर आर्वी व हिंगणघाट मतदार संघाची त्या-त्या ठिकाणी होणार आहे. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. वर्धा विधानसभा मतदार संघात एकूण २१ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश देशमुख, भाजपाचे डॉ. पंकज भोयर, काँग्रेसचे शेखर शेंडे, शिवसेनेचे रविकांत बालपांडे, बसपाचे नीरज गुजर ही दिग्गज मंडळी आपले राजकीय भवितव्य आजमावत होते. यासोबत बहुजन मुक्ती पार्टीचे किशोर किणकर, शेकाप स्कर्मिश खडसे यांच्यासह अन्य राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचाही समावेश आहे. खरी लढत प्रमुख राजकीय पक्षांच्या दिग्गजांमध्येच लढतीचे एकंदर चित्र आहे. मात्र कुणाच्या गळ्यात आमदारकीची माळ पडते, हे रविवारीच कळणार आहे. वर्धेत बहुरंगी लढतीचे चित्र असल्यामुळे उत्सुकता शिगेला पाहोचली आहे.देवळी मतदार संघात १९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहेत. यामध्ये काँग्रेसचे विद्यमान माजी मंत्री रणजित कांबळे, भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे, या दोन दिग्गजांमध्येच ही लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शशांक घोडमारे, बसपाचे उमेश म्हैसकर, शिवसेनेचे नीलेश गुल्हाने ही मंडळीदेखील रिंगणात होती. मतदार राजा रणजित कांबळे यांना चौथ्यांदा विधानसभेवर पाठविते वा माजी खासदार सुरेश वाघमारे यांना पहिल्यांदा पाठविते. याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.हिंगणघाट मतदार संघात १४ उमेदवार आपली राजकीय शक्ती पणाला लावून होते. यामध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार अशोक शिंदे, राष्ट्रवादी कडून माजी आमदार राजू तिमांडे, भाजपाकडून समीर कुणावार, काँग्रेसकडून उषाकिरण थुटे, बसपाचे प्रलय तेलंग, मनसेचे अतुल वांदिले ही दिग्गज मंडळी रिंगणात होती. यापैकी कोण नवा आमदार होईल, याची जनतेला उत्सुकता आहे.आर्वी मतदार संघात काँग्रेसकडून माजी आमदार अमर काळे आणि भाजपकडून विद्यमान आमदार दादाराव केचे यांच्यात कडवी झुंज बघायला मिळाली. या झुंजीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप काळे, प्रहारचे बाळा जगताप आणि शिवसेनेचे निलेश देशमुख यांनी चुरस निर्माण केल्यामुळे मतदार राजा कुणाचे गणित बिघडवेल याची उत्सुकता लागली आहे. अमर काळे यांना संधी द्यायची वा दादाराव केचे यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवायचा हे मतमोजणी नंतरच कळणार आहे. चारही मतदार संघात मतदारराजाचा कौल कुणाला याचे रहस्य उलगडणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)