महिलेस जाळणा-या आरोपीस जन्मठेप

By Admin | Updated: August 28, 2015 23:51 IST2015-08-28T23:51:11+5:302015-08-28T23:51:11+5:30

शिवणीमध्ये घडली होती घटना, न्यायालयाने तपासले ११ साक्षीदार.

Life imprisonment is a life imprisonment for women | महिलेस जाळणा-या आरोपीस जन्मठेप

महिलेस जाळणा-या आरोपीस जन्मठेप

अकोला - शिवणीमधील राहुलनगर येथील रहिवासी महिलेने उसणे दिलेले पैसे परत मागितल्यामुळे तिला २0१३ मध्ये जिवंत जाळण्यार्‍या आरोपीस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी. देशपांडे यांच्या न्यायालयाने शुक्रवारी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने या प्रकरणामध्ये ११ साक्षीदार तपासल्यानंतर तसेच मिळालेल्या ठोस पुराव्याच्या आधारे आरोपी दिलीप हनवते याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. शिवणीमधील राहुलनगरमधील रहिवासी अल्का संतोष चोपडे या महिलेने याच परिसरातील रहिवासी दिलीप हनवतेला उसणे म्हणून पैसे दिले होते. बराच कालावधी उलटल्यावरही हनवते हा पैसे देत नसल्याने अल्का चोपडे यांनी त्याला दिलेले पैसे परत मागण्यासाठी वारंवार फेर्‍या मारल्या. मात्र, हनवते याला पैसे द्यायचे नसल्याने आणि संतापाच्या भरात अल्का चोपडे हिच्या अंगावर ८ मे २0१३ रोजी रॉकेल टाकून पेटवून दिले होते. यामध्ये ही महिला ९५ टक्के जळाल्याने तिला तातडीने सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, १२ दिवस उपचार केल्यानंतर २0 मे २0१३ रोजी अल्काचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. अल्का चोपडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच पोलिसांनी घेतलेल्या मृत्यूपूर्व बयाणामध्ये तिने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांसमोर मांडला होता. त्यामुळे सिव्हिल लाइन्स पोलिसांनी या प्रकरणी दिलीप हनवते याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला होता. या हत्याकांडाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी आरोपपत्र न्यायालयात सादर केले. मृतक अल्का चोपडे हिची मृत्यूपूर्वीची जबानी, ११ साक्षीदारांची साक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी. देशपांडे यांच्या न्यायालयाने तपासल्यानंतर साक्ष व मृत्यूपूर्व बयाण ग्राहय़ धरले. त्यानंतर दिलीप हनवते याला आजन्म कारावासाची शिक्षा व ५0 हजार रुपये दंड ठोठावला. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अँड. विनोद फाटे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Life imprisonment is a life imprisonment for women