शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

कावड, पालखी महोत्सव; १४० पेक्षा जास्त पालख्यांची नोंदणी पूर्ण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 13:16 IST

जिल्ह्यातील  १४० पेक्षा जास्त पालखी मंडळांनी श्री राजेश्वर शिवभक्त मंडळाकडे नोंदणी केली आहे.

अकोला : श्री राजराजेश्वर शिवभक्त मंडळातर्फे यंदा कावड, पालखी महोत्सवाचा अमृत सोहळा सोमवार, २६ आॅगस्ट रोजी साजरा करण्यात येत आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील  १४० पेक्षा जास्त पालखी मंडळांनी श्री राजेश्वर शिवभक्त मंडळाकडे नोंदणी केली आहे. याशिवाय, शंभरपेक्षा जास्त कावड मंडळांचा सहभाग राहणार आहे.अकोल्यातील ऐतिहासिक कावड, पालखी महोत्सवाला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे यंदा कावड, पालखी महोत्सवाची विशेष तयारी करण्यात आली आहे. या अमृत महोत्सवात शिवभक्तांना नावीन्यपूर्ण आकर्षक झाकीचे दर्शन होणार आहे. या झाकीच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश दिले जाणार आहेत. रविवारी रात्री गांधीग्राम येथून श्री राजराजेश्वराची पालखी निघाल्यावर रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने फटाक्यांची आतषबाजी केली जाणार आहे. पालखी मार्गावर ठिकठिकाणी शिवभक्तांचे स्वागत करण्यात येणार आहे. शहरात आगमन झाल्यावर चौका-चौकांत शिवभक्तांच्या स्वागतासोबतच प्रसादाचेही आयोजन शिवभक्तांमार्फत करण्यात आले आहे. या ऐतिहासिक अमृत महोत्सवात श्री राजराजेश्वराच्या पालखीवर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी केली जाईल. तसेच महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे शेगाव येथील संत गजानन महाराज, संस्थानची दिंडी राहणार आहे. यामध्ये १०० वारकऱ्यांचा असणार सहभाग. शिव-पार्वती, श्रीगणेश व कार्तिकेय यांची झाकीदेखील लक्षवेधी ठरणार आहे.पालखी मार्ग खडतरच!पालखी मार्गाचे निर्माण कार्य सुरू असल्याने ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे आणि खडकांची चुरी आहे. आठवडाभरात या मार्गाची स्वच्छता करण्यात आली असून, काही प्रमाणात डागडुजी करण्यात आली आहे. असे असले, तरी पालखी वास्तविकतेमध्ये शिवभक्तांसाठी पालखी मार्ग खडतरच ठरणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाIndian Festivalsभारतीय सण