शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कारंजाचा काण्णव बंगला

By admin | Updated: September 18, 2014 02:42 IST

पोर्तुगीज स्थापत्य कलेशी जवळीक दाखविणारी कारंजा येथील ऐतिहासीक वास्तू.

प्रफुल्ल बानगावकर /कारंजा लाडपोतरुगीज स्थापत्य कलेशी साधम्र्य दाखविणारा आणि १0 हजार चौरस फुटाच्या क्षेत्रफळात वसलेला कारंजातील आकर्षण काण्णव बंगला वास्तुकलेचा आदेश नमुना ठरावा असाच आहे. १९0३ साली बांधलेला हा भव्य गतकाळातील सोनेरी स्मृती जपून आहेत. लोकमान्य टिळकांपासून गाणसम्राज्ञी लता मंगेशकरांचे पदस्पर्श या बंगल्याला लाभले आहेत. त्याचबरोबर बंगल्याची विशेषता अशी की श्रीलंकेचे माजी पंतप्रधान यांच्या बंगल्याची हुबेहुब प्रतिकृती म्हणजे कारंजाचा काण्णव बंगला होय.काण्णव घराण्याची पाचवी पिढी बंगल्यात नांदत आहे. परिवारातील सदस्य मधुकरराव काण्णव यांनी लोकमतशी बोलताना पूर्वजांनी येथे येवून कापसाचा व्यापार केला. त्यामध्ये त्यांना मोठा नफा मिळाला. व्यापार्‍याच्या निमित्ताने ते वारंवार मुंबईला जात असत. तेथील ब्रिटीश व पोतरुगीज स्थापत्याच्या वास्तू पाहत ते प्रभावित झाले आणि या बंगल्याची निर्मिती झाली. १८९९ साली सुरुवात होउन बांधकाम चार वर्ष चालले. या एकमजली बंगल्यात एकूण ३६ दालने असून दारे, खिडक्या, फर्निचर त्यावर बनवले आहे. हे लाकूड त्या काळी आशिया खंडात श्रेष्ठप्रतिचे समजले जायचे. वास्तुच्या मधोमध ३0 बाय ३0 चौरस फुटांचा चौक आहे. काण्णवांचे पूर्व पुरुष कृष्णाजी यांच्या पिढीत बांधकाम झाले. पाया खोदताना खोलवर काळी माती होती. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आठ फुटावर शिसे धातूचा वितळून सहा इंची थर टाकण्यात आला. बंगल्याचे प्रवेशद्वार सभामंडपासारखे असून सोमरचे दोन्ही नक्षीदार स्तंभ ओलीव बिडाचे आहेत. त्याचे वजन टनात आहेत. बांधणीचे काम काठेवाडी लोकांनी केले. सुतारकाम राजस्थानी कारागिरांनी केले. रंगरंगोटीचे काम विठोबा पेंटर (मुंबई) यांनी केले. श्रीलंकेच्या माजी पंतप्रधान सिरिमाओ बंदरनायके यांचा बंगला हुबेहुब असाच असल्याचे बोलले जाते. वरच्या मजल्यावर ५0 बाय ४0 चौरस फुटांचा दिवाणखाना आहे. हा दिवाणखाना महाराष्ट्रातील अनेक थोर व्यक्तीशी आपले नाते सांगतो. स्वातंत्र्य लढय़ाच्या काळात लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर कारंजात सभांच्या निमित्ताने आले, तेव्हा त्यांचा मुक्काम दिवाणखाण्यात झाला. बालगंधर्व, भाटेबुवा, शिरगोपीकर आदी नाटक कंपन्या कारंजात येत असत. यातील गायकांच्या स्वतंत्र मैफली काण्णवाकडे होत. त्यायोगे बालगंधर्व हिराबाई बडोदेककर, पंडित नारायणराव व्यास, जगन्नाथबुवा पंढरपूरकर, मनोहर बर्वे आदींसह केशवराव भोळे व पंडित दिनानाथ मंगेशकराच्या मैफली दिवाणखान्यात पाहिलेल्या आहेत. पंडित दिनानाथ अनेकदा कारजांत आले आहेत. एकदा तर नुकतेच त्याचे लग्न झाले होते .अंगाची हळदही सुकली नाही अशा अवस्थेत त्यांची नाटक कंपनी कारंजात आली. दरवेळी त्यांना काण्णवांचे निमंत्रण असायचे.कालपरत्वे गाणसम्राज्ञी लता मंगेशकरांचा जन्म झाला. लता दिदी दोन वर्षाच्या असताना, दिनानाथाची कंपनी पुन्हा कारंजात आली. नेहमीप्रमाणे ते मैफलीसाठी काण्णवांकडे आले. लहानगी लता दिनानाथाची बोटं धरुन बंगल्यात फिरली आणि मैफील सुरु झाल्यावर त्याच जागी झोपली.