शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पाणलोटाचा अनुशेष पोहचला ३0 हजार कोटींवर!

By admin | Updated: November 11, 2014 23:41 IST

केंद्र शासनाचे नियोजन; पण राज्य पडले मागे!

राजरत्न सिरसाट/अकोलाराज्यातील पाणलोट क्षेत्राचा अनुशेष ३0 हजार कोटींच्यावर पोहचला असून, याचा फटका शेती विकासाला बसत आहे. कृषी क्षेत्रात आघाडीवर असलेलेल महाराष्ट्र राज्य पाणलोट विकासाच्या बाबतीत पिछाडल्यामुळे आर्श्‍चय व्यक्त होत आहे. आता केंद्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने पाणलोट क्षेत्र विकासाचे नवे नियोजन केले असून, जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून देशात पाणलोटाची कामे केली जाणार आहेत.केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास अभियानातंर्गत, देशातील ग्राम विकासाच्या संदर्भात केंद्र शासनाने एक महिन्यापूर्वी महत्वाची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला महाराष्ट्रातील तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. सभेत विविध राज्यांमधील सिंचन योजना, पाणलोट आदी विषयांवर तज्ज्ञांची मते जाणून घेण्यात आली. तज्ज्ञांची मते जाणून घेतल्यानंतर, आता सिंचन, पाणलोटासंदर्भात निश्‍चित धोरण ठरविण्यात येत आहे. त्यापूर्वी जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून देशात पाणलोटाची कामे केली जाणार असून, या बाबतीत महाराष्ट्रावरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. राज्यात पाणलोटाचा २८ हजार कोटी रुपयांचा अनुशेष शिल्लक आहे. पाणी हाच विकासासाठीचा महत्त्वाचा घटक असल्याने, त्यासाठी या निधीची गरज आहे. केंद्र शासन जागतिक बॅकेंच्या अर्थसाहाय्यातून पाणलोटाची कामे करणार असले तरी, राज्य शासनानेही या बाबतीत दखल घेण्याची गरज असल्याचे जल व भूमी व्यवस्थापन (वाल्मी), औरंगाबादचे माजी संचालक डॉ.एस.बी. वराडे यांनी सांगीतले. *पाणलोटासाठी सूक्ष्म अभ्यासाची गरज राज्यात भूजल स्तर (जीओ हायड्रोलॉजी)चा सूक्ष्म अभ्यास करण्याची गरज आहे. पाऊस कुठे जास्त होतो, कुठे नाही, हे बघून पाणी अडविण्याची गरज आहे; तथापि सध्या तसे होत नसल्याने राज्यात पाणलोटावर होत असलेला खर्च व्यर्थ जात आहे. *विदर्भात १0 हजार कोटींचा अनुशेषविदर्भातील पाणलोट विकासाचा अनुशेष दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मराठवाठय़ासाठी सहा हजार कोटी, तर इतर उर्वरित राज्य मिळून ३0 हजार कोटी रुपयांची रक्कम पाणलोट कार्यक्रमासाठी अपेक्षित आहे. विदर्भातील ९0 टक्के शेती कोरडवाहू असल्याने, या भागात ही कामे जलदगतीने होण्याची गरज आहे.