शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

बिडी व्यापा-यास लुटणारे आरोपी जेरबंद

By admin | Updated: November 30, 2014 00:47 IST

अकोला येथील घटना; चार लाख रुपयांची रोकड हस्तगत.

अकोला : शहरातील बिडी व्यापारी पंकज पटेल यांना मारहाण करून त्यांच्याकडील ५ लाख ४५ हजार रुपयांची रक्कम लुटणार्‍या टोळीचा शुक्रवारी पर्दाफाश करण्यात आला आहे. या टोळीतील पाच आरोपींना शुक्रवारी व दोन आरोपींना शनिवारी अटक करण्यात आली असून, यामधील दोन अल्पवयीन आरोपींना सोडण्यात आले तर पाच आरोपींना न्यायालयाने २ डिसेंबरपर्यंंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सिव्हिल लाइन्स पोलिसांनी या प्रकरणातील ३ लाख ८0 हजार रुपये चोरट्यांकडून जप्त केले असून, आरोपींनी गुन्हय़ाची कबुली दिली आहे. तोष्णीवाल लेआऊट परिसरातील रहिवासी पंकज पटेल १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता ५ लाख ४५ हजार रुपयांची रक्कम घेऊन जात असताना शासकीय दूध डेअरीनजिक शनी मंदिरासमोर त्यांना वाहनावर आलेल्या चार युवकांनी मारहाण करून त्यांच्याकडील रक्कम असलेली बॅग घेऊन पळ काढला. भरदिवसा घडलेल्या या लुटमार प्रकरणामुळे पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली. पोलिसांनी या प्रकरणाचा शोध सुरू केला, मात्र यामधील आरोपींचा सुगावा लागला नाही. गुरुवारी मध्यरात्री सिव्हिल लाइन्स पोलीस गस्तीवर असताना नेहरू पार्क चौकातील पाण्याच्या टाकीजवळ पाच युवक दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना सिव्हिल लाइन्स पोलिसांनी अटक केली. या पाचही युवकांची चौकशी केली असता त्यांनी बिडी व्यापारी पंकज पटेल यांना मारहाण करून त्यांच्याकडील रक्कम लुटल्याची कबुली दिली. यामध्ये आळशी प्लॉट येथील रहिवासी गुड्डू गणेश परिहार, खदान येथील रहिवासी चंदू किशोर निखले, शिवसेना वसाहत येथील रहिवासी दुर्गेश ऊर्फ गोटू गजानन राऊत यांचा समावेश होता. या आरोपींना शुक्रवारी अटक करण्यात आली असून, शनिवारी शिवसेना वसाहत येथील रहिवासी चेतन मारोती डिवरे व रामेश्‍वर सुधाकर डाहे यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.