शहरं
Join us  
Trending Stories
1
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
2
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
5
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
6
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
7
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
8
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
9
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
10
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
11
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
12
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
13
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
14
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
15
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
16
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
17
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
18
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
19
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांमध्ये अनियमितता

By admin | Updated: June 12, 2014 20:31 IST

एकाच कार्यालयात पाच वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांची बदली करण्यात आली.

अकोला: जिल्हा परिषद कर्मचार्‍यांची ह्यबाबूगिरीह्ण संपविण्यासाठी एकाच कार्यालयात पाच वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांची बदली करण्यात आली. सोमवारपासून राबविल्या जात असलेल्या या प्रक्रियेत अनियमितता झाली आहे. सेवाज्येष्ठता डावलून बदल करताना सोयीच्या कर्मचार्‍यांना विभागात कायम ठेवण्यात आले असल्याचे बुधवारी उघडकीस आले.
जिल्हा परिषद अर्थ विभागातील वरिष्ठ सहायक (लेखा) या संवर्गातील कर्मचार्‍यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी देण्यात आले. बदली आदेश देताना सेवाज्येष्ठतेनुसार कार्यवाही होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात सेवाज्येष्ठता नियमाचे कोणतेही पालन न करता सोयीच्या कर्मचार्‍यांना विभागात कायम ठेवून इतरांची नियमात बसत नसतानाही बदली करण्यात आली. ९ वर्षे आणि १ महिना वित्त विभागात कार्यरत एन.व्ही. आखरे आणि आर.के. मानकर यांना बदली प्रक्रियेतून डावलण्यात आले. दुसरीकडे ५ वर्षे आणि ८ महिने सेवाज्येष्ठता असलेल्या जी.एम. नळकांडे आणि जी.एन. वानखडे यांची बदली करण्यात आली. नियमानुसार पाच वर्षांपेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचार्‍यांची बदली करण्यात येत असली तरी बदली करण्याच्या नियमानुसार रिक्त पदं आणि बदली प्रक्रिया राबवित असताना रिक्त होणार्‍या पदांचा विचार करून सेवाज्येष्ठतेनुसार पात्र कर्मचार्‍यांची बदली करणे आवश्यक आहे. या नियमाकडे जिल्हा परिषद अर्थ विभागात बगल देण्यात आले दिसून येते.