शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील जिल्हाप्रमुखांना ‘सेना भवनातून’ निमंत्रण

By admin | Updated: September 18, 2014 01:12 IST

भाजपवर दबाव निर्माण करण्यासाठी शिवसेनेचा पवित्रा; १९ सप्टेंबररोजी कार्यकारणीची बैठक.

वाशिम : भारतीय जनता पक्षावर दबाव वाढविण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली असून या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून राज्यभरातील सर्व जिल्हा प्रमुखांना त्यांच्या जिल्ह्यातील सर्व मतदारसंघाची माहिती घेऊन मुंबईला बोलवण्यात आले आहे. आगामी १९ सप्टेंबरला राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यात महायुती अथवा स्वबळावर लढण्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता राजकारणांकडुन व्यक्त केल्या जात आहे. आगामी १५ ऑक्टोंबरला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूकीने सद्या राजकीय वातावरण तापविले आहे. सदर निवडणूकीत विजयाच्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न चालविले आहेत. वाशिम जिल्ह्यात विधानसभेचे तिन मतदार संघ आहेत. शिवसेना, भारतीय जनता पक्ष, रिपाइं, शिवसंग्राम, स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्षाच्या महायुतीमध्ये अनुसुचित जातीच्या उमेदवारांसाठी आरक्षीत असलेल्या वाशिम सह रिसोड मतदारसंघ भाजपच्या तर कारंजा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे. मात्र, सद्यस्थितीत जागा वाटपाच्या मुद्दावरून भाजपशी दुरावा वाढल्याने शिवसेनेने अधिक आक्रमक होत आपली शक्ती दाखवून देण्यासाठी पावले उचलणे सुरू केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीमध्ये लढायचे अथवा स्वबळ आजमायचे यावर चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या नेतृत्वाने राज्यभरातील जिल्हाप्रमुखांसह प्रमुख पदाधिकार्‍यांना मुंबईला बोलाविले आहे. १९ ऑक्टोंबरला शिवसेनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडणार असुन या बैठकीत महायुतीत लढायचे अथवा नाही याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचाहीया बैठकीत अंदाज घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील इत्थंभूत माहिती पक्षाच्या नेत्यांनी यापूर्वीच घेतली आहे. त्यात कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार राहू शकतो याचाही समावेश आहे. त्यामुळे बैठकीत सेना नेतृत्व कोणता संदेश देतात याकडे लक्ष लागले आहे.