रेल्वेस्थानक पोखरताहेत घुशी

By Admin | Updated: July 14, 2014 01:23 IST2014-07-14T00:15:42+5:302014-07-14T01:23:52+5:30

अकोला रेल्वेस्थानक प्रशासनाला सध्या वेगळय़ाच समस्येने ग्रासले आहे.

Intrusion with the railway station | रेल्वेस्थानक पोखरताहेत घुशी

रेल्वेस्थानक पोखरताहेत घुशी

अकोला : मॉडेल स्टेशनचा दर्जा असेल्या अकोला रेल्वेस्थानक प्रशासनाला सध्या वेगळय़ाच समस्येने ग्रासले आहे. परिसरात घुशींचा वावर अधिक वाढलयाने रेल्वे रुळ आणि फलाटांवर प्रवाशांनी इतस्त: फेकलेले अन्नपदार्थांचे कण खाण्यासाठी फिरणार्‍या घुशी परिसरातच बिळ करून रेल्वे स्थानक परिसरातील जमिन पोखरून काढत आहेत. पोखलेली जमिन बुजविताना रेल्वे कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
अकोला रेल्वेस्थानक व परिसरात कायम येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांची वर्दळ असते. मात्र, नको असलेले अन्न पदार्थ इतस्त: टाकणार्‍या प्रवाशांच्या वृत्तीमुळे रेल्वे स्थानकाचा गाभा पोखरला जात असल्याची माहिती साफसफाई आणि डागडुजीची कामे करणार्‍या अधिकार्‍यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली. अकोला रेल्वेस्थानकाच्या निर्मितीला अनेक वर्षे उलटून गेली आहेत. निकृष्ट होणार्‍या प्रत्येक गोष्टींची या ठिकाणी वारंवार डागडुजी केली जाते. रेल्वेने प्रवास करणार्‍या किंवा फलाटांवर उभ्या असलेल्या प्रवाशांकरवी रेल्वे रुळांवर आणि फलाटावर इतस्त: टाकलेले अन्न, पदार्थ खाण्यासाठी फिरणार्‍या घुशी स्थानक परिसरात बिळ करून राहतात. रेल्वे रुळावर पडलेले अन्न खाणार्‍या घुशी रुळांखालचा भाग तर पोखरतातच, शिवाय फलाटाचा गाभादेखील पोकळ करीत आहेत. वाट मिळेल तिकडे पोखरून बिळ करणार्‍या घुशींमुळे फलाटांवरील सांडपाणी वाहून नेणार्‍या नाल्यांमध्ये माती साठते. खालचा भाग पोकळ झाल्याने फलाटांवर लावलेल्या टाईल्स अनेकदा उखडल्या आहेत. रेल्वे स्थानक परिसरात व फलाटांवर ठिकठिकाणी नको असलेले अन्न पदार्थ आणि इतर कचरा टाकण्यासाठी कचरापेट्या ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांचा उपयोग फारसा प्रवासी करीत नसल्याने घुशींवर आळा घालणे कठीण होऊन गेले असल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

Web Title: Intrusion with the railway station