शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जलवर्धन संस्थेसह खड्डे खोदणा-यांची चौकशी

By admin | Updated: August 23, 2016 01:04 IST

संस्थेच्या नोंदणीचे दस्तावेज मागविले: लवकरच अटकसत्र; दोन बालकांचे मृत्यू प्रकरण.

अकोला, दि. २२: आदर्श कॉलनी येथील मनपाच्या शाळा क्रमांक १६ वरील मैदानामध्ये जलवर्धन संस्थेने खोदलेल्या खड्डय़ात बुडून दोन बालकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी खदान पोलिसांनी मनपा आयुक्तांसह, जलवर्धन संस्थेचे पदाधिकारी, अभियंता आणि कंत्राटदारांवर गुन्हे दाखल केले आहेत. खदान पोलिसांनी जलवर्धन संस्थेच्या नोंदणीचे दस्तावेज तपासणी सुरू केले असून खड्डे खोदण्यासाठी कुणी परवानगी दिली, याचीही चौकशी खदान पोलिसांनी सुरू केली आहे. आदर्श कॉलनी परिसरातील मित्रनगरला लागून असलेल्या वसाहतमधील रहिवासी राजेश घनगावकर यांचा मुलगा सिद्धार्थ (७) आणि याच परिसरातील रहिवासी राकेश बहेल यांचा मुलगा कृष्णा (१0) हे दोघे मनपाच्या शाळा क्रमांक १६ च्या मैदानावर खेळत होते. या मैदानावर जलवर्धन या संस्थेने खोल चर खोदलेली होती. यामध्येच १0 फूट खोलीचे तीन शोषखड्डे खोदण्यात आले होते. या शोषखड्डय़ांचे बांधकाम पूर्ण न केल्याने खड्डय़ात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. कृष्णा आणि सिद्धार्थ हे दोघे येथे खेळत असतानाच ते शोषखड्डय़ात पडले. शोषखड्डय़ात गाळ असल्याने दोघेही या गाळात फसून त्यांचा मृत्यू झाला. जलवर्धन संस्थेने बांधलेल्या या तीन शोषखड्डय़ांची कामे त्यांनी अर्धवट केल्यानेच दोन्ही बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला होता. या शोषखड्डय़ात पाणी साचल्याने त्याला तारेचे कुंपण घेणे गरजेचे होते; मात्र जलवर्धन संस्थेने ना तारेचे कुंपण घेतले, ना या ठिकाणी धोका असल्याचे फलक लावले. त्यामुळे दोन बालकांचा बळी गेल्यानंतर या प्रकरणी खदान पोलिसांनी मनपा आयुक्तांसह जलवर्धन संस्थेच्या पदाधिकार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यानंतर या प्रकरणातील दोषींचा शोध घेणे पोलिसांनी सुरू केले असून सदरचे खड्डे कुणी खोदले, त्याला परवानगी होती काय, ती कुणाची परवानगी होती, जेसीबी कुणाचा होता यासह जलवर्धन संस्था ही नोंदणीकृत आहे काय, या सर्व प्रश्नांची उकल खदान पोलिसांकडून करण्यात येत आहे.