भारतीय जवानांमुळे देशाच्या सीमा सुरक्षित : बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:14 IST2021-02-05T06:14:35+5:302021-02-05T06:14:35+5:30

२६ जानेवारी रोजी येथील शहीद जवान विजय तायडे यांच्या मातोश्रींची त्यांनी भेट घेतली आणि कुटुंबीयांची आस्थेने चौकशी केली. त्यांनी ...

Indian soldiers secure the country's borders: Bachchu Kadu | भारतीय जवानांमुळे देशाच्या सीमा सुरक्षित : बच्चू कडू

भारतीय जवानांमुळे देशाच्या सीमा सुरक्षित : बच्चू कडू

२६ जानेवारी रोजी येथील शहीद जवान विजय तायडे यांच्या मातोश्रींची त्यांनी भेट घेतली आणि कुटुंबीयांची आस्थेने चौकशी केली. त्यांनी शहीद जवान विजय तायडे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शहीद जवान विजय तायडे यांच्या वीरमाता मनकर्णा बापुराव तायडे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. याप्रसंगी कारगील शहीद जवान विजय तायडे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भैययासाहेब तायडे, उपविभागीय अधिकारी अमरसिंह मोहिते, गटविकास विकास अधिकारी बाळासाहेब बायस, माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे, सैनिक कल्याण अधिकारी निखाडे, रूपेश कडू, मनीष साबळे, महेंद्र बोळे, प्रभारी तहसीलदार डाबेराव, मंडळ अधिकारी जाधव, तलाठी प्रवीण ताले उपस्थित होते. याप्रसंगी शहीद जवान विजय तायडे यांच्या स्मारकाचे सौंदर्यीकरण, जामठी फाटा येथे प्रवेशद्वार, गावातील अंतर्गत रस्ते दुरुस्त करणे आदी मागण्यांचे निवेदन पालकमंत्री कडू यांना देण्यात आले.

फोटो:

Web Title: Indian soldiers secure the country's borders: Bachchu Kadu