शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

राखमिश्रीत दूषित पाणी धरणात सोडणे तत्काळ बंद करा!

By admin | Updated: January 8, 2015 00:49 IST

बळीराम सिरस्कार यांचे मुख्य अभियंत्यांना निर्देश ; घटनास्थळाची पाहणी.

अकोला : पारस येथील वीज निर्मिती प्रकल्पात तयार होणारी ज्वलनशील राख, १६ कोटी रुपये खचरून बांधलेल्या अँश पाँडमध्ये सोडण्याऐवजी, मन नदीवरील धरणात सोडण्यात येत आहे. ही बाब ह्यलोकमतह्णने उजेडात आणताच स्थानिक आमदार बळीराम सिरस्कार यांनी पारस येथील वीज निर्मिती केंद्रात जाऊन दूषित पाणी सोडण्यात येत असलेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुख्य अभियंत्यांना पाणी सोडण्याच्या कामात होत असलेल्या निष्काळजीबाबत चांगलेच धारेवर धरले आणि दुषित पाणी धरणात सोडणे बंद करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.बाळापूर तालुक्यातील पारस येथे महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचा वीज निर्मिती प्रकल्प असून, यात दररोज शेकडो टन राख जमा होते. ही राख एका पाइपद्वारे कोळासा परिसरातील मोठय़ा भूखंडावर द्रव रूपात जमा केली जाते. द्रव रूपात असलेली ही राख या ठिकाणी गोळा करून, त्यातील पाणी वेगळे केले जाते. त्यानंतर उरलेल्या राखेची विक्री केली जाते. पाणी वेगळे करून राख साठविण्याकरिता १६ कोटी रुपयांचा अँश पाँड प्रकल्प येथे उभारण्यात आला आहे. त्या अँश पाँडपर्यंत पाइपलाइनद्वारे राख पोहोचविण्याकरिता मनारखेडमध्ये पंप हाऊस बांधण्यात आले आहे; मात्र वीज निर्मिती प्रकल्पातून निघालेली राख अँश पाँडपर्यंत पोहोचतच नाही. हे राखमि२िँं१्रूँं१त दूषित पाणी पंप हाऊसजवळून एका नालीद्वारे थेट मन नदीवर बांधलेल्या धरणात सोडण्यात येते असल्याचे लोकमतने बुधवारच्या अंकात प्रकाशित केले. तसेच या पाण्यात असलेल्या घातक रसायनांमुळे परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य कसे धोक्यात येऊ शकते, याबाबतचा आरोग्य प्रयोगशाळेचा अहवालही प्रसिद्ध केला. प्रकल्पाच्या आत सुरू असलेल्या कामामध्ये होत असलेल्या निष्काळजीपणा लोकमतच्या माध्यमातून उघडकीस आल्यानंतर बुधवारी सकाळीच आमदार सिरस्कार यांनी प्रकल्पावर धाव घेतले. वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता रवींद्र गोहणे यांना सोबत घेऊन त्यांनी धरणात पाणी सोडण्यात येत असलेल्या भागाची पाहणी केली. धरणात पाणी सोडताना होत असलेला निष्काळजीपणा बघून त्यांनी मुख्य अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले. पंप हाऊसचे काम तत्काळ पूर्ण करण्याची सूचना त्यांनी अभियंत्यांना केली. तसेच प्रक्रिया न करता पाणी धरणात सोडले जाणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत त्यांनी मुख्य अभियंत्यांना सूचना केली. वीज निर्मिती केंद्रातील दूषित पाणी धरणात सोडण्यापूर्वी प्रक्रिया होऊनच सोडणे आवश्यक आहे. प्रकल्पाच्या आत कोणते काम सुरू आहे, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष जात नाही. अडचणीच्या ठिकाणी असल्याने त्याकडे सहसा कुणी जाऊन बघत नाही. लोकमतच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे आता कामाला गती येईल. त्याबाबत अभियंत्यांना सूचना दिली असल्याचे आमदार बळीराम सिरस्कार यांनी सांगीतले.