बार्शीटाकळी-कापशी मार्गावर अवैध वृक्षतोड

By Admin | Updated: May 24, 2014 20:20 IST2014-05-23T19:10:46+5:302014-05-24T20:20:53+5:30

बार्शीटाकळी : बार्शीटाकळी ते कापशी मार्गावरील हिरव्यागार वृक्षांची अवैधरीत्या कत्तल होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे.

Illegal tree trunk on the Barshittikalkali-Kapasya road | बार्शीटाकळी-कापशी मार्गावर अवैध वृक्षतोड

बार्शीटाकळी-कापशी मार्गावर अवैध वृक्षतोड

बार्शीटाकळी : बार्शीटाकळी ते कापशी मार्गावरील हिरव्यागार वृक्षांची अवैधरीत्या कत्तल होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे.
बार्शीटाकळी ते कापशी मार्गाच्या दुतर्फा स्वातंत्र्यपूर्व काळातील लिंब, बाभूळ आदी डेरेदार वृक्ष आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत या मार्गाने येणार्‍या-जाणार्‍यांना या वृक्षाच्या सावलीचा आधार मिळतो. परंतु, अलीकडे या वृक्षांची अवैधरीत्या तोडणी केली जात आहे. दिवसा या मार्गावर प्रचंड रहदारी असते. त्यामुळे वृक्षतोड करणारे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतात. संबंधित विभागाने या वृक्षतोडीकडे लक्ष देऊन पर्यावरणाचा होणारा र्‍हास टाळावा, अशी मागणी जोर धरत आहे.  

Web Title: Illegal tree trunk on the Barshittikalkali-Kapasya road