शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कर्मचा-यांची ओळख परेड; १0८ गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2017 02:52 IST

महापौर, आयुक्तांचा पुढाकार

अकोला, दि. १८- शहरातील साफसफाईची गाडी रुळावर आणण्यासाठी महापौर विजय अग्रवाल व महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी समन्वय साधत पुढाकार घेतला. मनपाच्या आस्थापनेवर कार्यरत सफाई कर्मचार्‍यांची शनिवारी खुले नाट्यगृहात ओळख परेड घेण्यात आली असता, ७११ सफाई कर्मचार्‍यांपैकी १0८ कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. महापालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत सफाई कर्मचार्‍यांच्या माध्यमातून शहरातील प्रशासकीय प्रभागांमध्ये साफसफाईची कामे केली जातात, तर उर्वरित पडीत प्रभागांमध्ये कंत्राटदारांमार्फत नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांमार्फत दैनंदिन साफसफाईची कामे होतात. आस्थापनेवरील सफाई कर्मचार्‍यांची संख्या व त्यांना नेमून दिलेल्या परिसरात फेरफटका मारला असता, ठिकठिकाणी साचलेली घाण व कचरा आढळून येतो. सकाळी कामावर हजेरी दाखविली जात असली, तरी त्यानंतर मात्र सफाई कर्मचारी नेमके कोठे काम करतात, असा सवाल उपस्थित होतो. परिणामी, कचर्‍याची समस्या कायम असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या समस्येवर प्रभावी उपाय शोधण्यासाठी महापौर विजय अग्रवाल, मनपा आयुक्त अजय लहाने यांनी समन्वय साधत सफाई कर्मचार्‍यांची ओळख परेड घेण्याचा निर्णय घेतला. प्रभागनिहाय काम करणार्‍या सफाई कर्मचार्‍यांना शनिवारी खुले नाट्यगृहात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी ७११ सफाई कर्मचार्‍यांपैकी ५६६ कर्मचारी हजर होते. १0८ कर्मचारी गैरहजर आढळून आले, तर ३७ सफाई कर्मचारी रजेवर असल्याचे समोर आले. यावेळी उपायुक्त समाधान सोळंके, क्षेत्रीय अधिकारी जी.एम. पांडे, अनिल बिडवे, सहायक आरोग्य अधिकारी अब्दुल मतीन तसेच सर्व आरोग्य निरीक्षक उपस्थित होते. ओळखपत्र आवश्यकप्रभागांमध्ये दैनंदिन साफसफाई करणार्‍या सफाई कर्मचार्‍यांना यापुढे ओळखपत्र आवश्यक आहे, तसेच प्रशासनाने निश्‍चित केलेला गणवेश घालूनच कर्मचार्‍यांना कार्यरत राहावे लागेल.