शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीकडे विभागीय आयुक्तांचा कानाडोळा

By admin | Updated: January 3, 2015 01:28 IST

पीक नुकसानीची घेतली नाही माहिती.

संतोष येलकर / अकोला: जिल्हा दौर्‍यावर आलेल्या विभागीय आयुक्तांनी शुक्रवारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेतली; मात्र अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यात झालेल्या पीक नुकसानीची माहिती घेतली नाही. त्यामुळे गारपिटीमुळे झालेल्या जिल्ह्यातील नुकसानीकडे विभागीय आयुक्तांनी कानाडोळा केल्याचा प्रत्यय आला. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर अकोला शहरासह जिल्ह्यातील तीन प्रस्तावित पाणीपुरवठा योजनांसाठी मोका पाहणीकरिता अमरावती विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर शुक्रवारी अकोला दौर्‍यावर आले होते. योजनांच्या पाहणीपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेऊन, प्रस्तावित पाणीपुरवठा योजना आणि त्यांची आवश्यकता, यासंदर्भात चर्चा केली. गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हरभरा, गहू, कपाशी, ओवा, लिंबू व केळी इत्यादी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे आधीच नापिकीमुळे दुष्काळाच्या झळा सहन करणारा जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. या पृष्ठभूमीवर अकोला दौर्‍यात विभागीय आयुक्त अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून घेतील, त्यासंदर्भात चर्चा करतील, अशी अपेक्षा होती. मात्र जिल्हा दौर्‍यावर आलेले विभागीय आयुक्तांनी केवळ पाणीपुरवठा योजनांसदर्भात लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत आणि बैठकीनंतर अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा तर दूर साधी माहितीदेखील विभागीय आयुक्तांनी घेतली नाही. त्यामुळे अवकाळी पाऊस गारपिटीमुळे जिल्ह्यात झालेले नुकसान व त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांकडे विभागीय आयुक्तांनी कानाडोळा केल्याचा प्रत्यय आला. *विचारणाही केली नाही! जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यापूर्वी, बैठकीत किंवा बैठकीनंतर, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यात किती नुकसान झाले, यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाच्या संबंधित अधिकार्‍यांना साधी विचारणाही केली नाही. तसेच याबाबत साधा उल्लेखदेखील केला नाही. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची माहिती घेण्याकडे आयुक्तांनी केलेल्या कानाडोळ्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.