राधाकिसन प्लॉटमधून गुटखा जप्त

By Admin | Updated: July 15, 2015 01:32 IST2015-07-15T01:32:33+5:302015-07-15T01:32:33+5:30

१0 हजार रुपयांचा गुटखा जप्त.

Gurkha seized from Radhakison plot | राधाकिसन प्लॉटमधून गुटखा जप्त

राधाकिसन प्लॉटमधून गुटखा जप्त

अकोला : सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राधाकिसन प्लॉटमधील एका घरातून पोलिसांनी सुमारे १0 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. यावेळी एका गुटखा माफियास अटक करण्यात आली असून, ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. राधाकिसन प्लॉट येथील रहिवासी हरीष केशवलाल सांगानी यांच्या घरात प्रतिबंधित गुटख्याचा साठा असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी तसेच सिटी कोतवाली पोलिसांना मिळाली. यावरून मंगळवारी अन्न व औषध प्रशासन तसेच पोलिसांनी सांगानी यांच्या घरात छापा मारून सुमारे १0 हजार रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला. यामध्ये विमल गुटखा, पान मसाला, तंबाखू, पानपराग पानमसाला, पानबहार पानमसाला, बीएचआर खानदानी तंबाखूसह इतर गुटखा साठा जप्त केला. राज्यात गुटखाबंदी असतानाही चोरट्या मार्गाने गुटख्याची विक्री सुरूच आहे. गुटखा माफियांनी या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल सुरू केली असून, त्यांच्यावर अन्न व औषध प्रशासनाने आता करडी नजर ठेवली आहे. जिल्हय़ात गुटख्याची चोरट्या मार्गाने वाहतूक सुरू असल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही कारवाई सह आयुक्त एस. एम. कोलते यांच्या मार्गदर्शनात अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार व पोलीस कर्मचार्‍यांनी केली.

Web Title: Gurkha seized from Radhakison plot