शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपाताच्या औषधांचा गोरखधंदा

By admin | Updated: November 29, 2014 01:11 IST

बेकायदा औषधविक्री बेधडक सुरूच

सचिन राऊत / अकोलाशासनाने नियमावली ठरवून दिली, कायद्याचे बंधन घालून दिले तरी बाजारात गर्भपाताची औषधे बिनबोभाट मिळतात. फक्त त्यांसाठी मूळ किमतीच्या किमान दहापट रक्कम द्यावी लागते. सर्व नियम, कायदे धाब्यावर बसवत गर्भपाताच्या औषधांचा गोरखधंदा सुरूच केल्याची माहिती ह्यलोकमतह्णने शुक्रवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून आली आहे. ३00 रुपयांची गर्भपाताची कीट तीन-चार हजार रुपयांना कुठल्याही अडथळ्याविना विकली जात असल्याचेही समोर आले आहे. गर्भपाताच्या औषधांची खुलेआम विक्री होत असल्याने अवैध गर्भपात मोठय़ा प्रमाणात वाढले होते. अशाच औषधांचा वापर करीत बिड जिल्ह्यातील गर्भपातासाठी कुख्यात डॉ. सुदाम मुंडे यांनी मुलींची गर्भातच हत्या केल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले होते. त्यामुळे शासनाने गर्भपातासंबंधी औषधांच्या विक्रीसाठी ठोक औषध विक्रेता, किरकोळ औषध विक्रेता व डॉक्टरांसाठी नियमावली तयार केली होती. या नियमांच्या चौकटीतच गर्भपाताच्या औषधीची विक्री करण्याचे आदेश होते. त्याच्या अंमलबजावणीचे आदेश अन्न व औषध प्रशासनाला दिले असले तरी या विभागाच्या अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे गर्भपाताच्या औषधांची खुलेआम, नियमबाह्य विक्री जोरात सुरू असल्याचे ह्यलोकमतह्णने आज केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून उजेडात आले आहे. गर्भपाताची औषध विक्री करताना डॉक्टरचे नाव, गाव, पत्ता, नोंदणी क्रमांक, शासनमान्य गर्भपात केंद्र आहे किंवा नाही या बाबी नियमानुसार ठरविण्यात आल्या आहेत, तर रुग्णाचे नाव, गाव, पत्ता व इतर माहिती डॉक्टरने नोंदवून ठेवणे आवश्यक ठरते. हे सर्व रेकॉर्ड औषधी विक्रेत्यांनी ठेवणे बंधनकारक आहे. गर्भपाताच्या औषध विक्रीचे रेकॉर्ड ठेवण्याची कटकट असल्याने आणि नियमबाह्य विक्री करता येत नसल्याने या त्रिकुटाने विना देयकाने औषध आणणे आणि विना देयकानेच त्याची विक्री सुरु केल्याची माहिती लोकमतच्या हाती लागली. या माहितीवरून स्टिंग ऑपरेशन केले असता, गर्भपाताच्या औषधांची बेकायदा विक्री जोरात सुरू असल्याचे वास्तव समोर आले. याबाबत औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांना माहिती आहे, मात्र त्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. यासंदर्भात अन्न व औषधी विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.