शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या अहवालातून ग्रामपंचायतींचे पितळ उघडे

By admin | Updated: October 25, 2014 00:58 IST

३१ टक्केच झाडे जिवंत, वृक्षलागवडीची कामे झालीच नाहीत.

विवेक चांदूरकर /अकोलाजिल्ह्यात गावागावांमध्ये मग्रारोहयो अंतर्गत वृक्षलागवडीची कामे करण्यात आली. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाल्यावरही झाड काही दिसेनात. त्यामुळे शासनाने या कामांची तपासणी शाळकरी विद्यार्थ्यांमार्फत करण्याचे ठरविले. या विद्यार्थ्यांनी आपल्या निष्पक्ष अहवालात जिल्ह्यातील ५३ कामांना निरंकचा शेरा दिल्याने ग्रामपंचायतींचे पितळ उघडे पडले आहे. मग्रारोहयो अंतर्गत जिल्ह्यात १ लाख ८७ हजार ९३८ झाडांपैकी केवळ ५९ हजार ४७४ झाडेच जगली आहेत. ही टक्केवारी केवळ ३१.६४ आहे. परिणामी प्रशासनाच्या भुवया उंचावल्या असून, मग्रारोहयोच्या कामात किती भ्रष्टाचार होतो, हे उघडकीस आले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना अंतर्गत ग्रामपंचायतींमार्फत जिल्ह्यात वृक्षलावगडीची कामे करण्यात आली. मात्र, मग्रारोहयोच्या कामात भ्रष्टाचार होतो. या प्रकरणांची तपासणी करणार्‍या अधिकार्‍यांनाही ह्यमॅनेजह्ण करण्यात येते. तपासणीनंतरही सत्य बाहेर येत नाही. त्यामुळे शासनाने या कामांची तपासणी करण्याची जबाबदारी राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांवर सोपविली. त्याकरिता जिल्हास्तरावर एका समितीचे गठण करण्यात आले. या समितीने रोहयोच्या कामाचे मोजमाप व त्याचा अहवाल तयार करण्याकरिता प्रत्येक गावात दोन विद्यार्थी व एका शिक्षक असे पथक पाठविले. गावात किती कामे झाली व किती झाडे लावण्यात आली, याची माहिती तसेच एक तक्ताही विद्यार्थ्यांकडे देण्यात आला. या तक्त्यानुसार लावण्यात आलेली झाडे व प्रत्यक्ष असलेली झाडे यांची माहिती विद्यार्थ्यांनी गोळा केली. त्याच्याकडून खूप चांगले, निश्‍चित चांगले, समाधानकारक, असमाधानकारक, निरंक असे वर्गीकरण झाले. जिल्ह्यातील २0७ गावांमध्ये ७८ कामांचा असमाधानकारक, तर ५३ कामांना विद्यार्थ्यांनी निरंकचा शेरा दिला आहे. जिल्ह्यात १ लाख ८७ हजार ९३८ झाडांपैकी केवळ ५९ हजार ४७४ झाडेच जगली आहेत.