शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आता मतदान केंद्रांवरच?

By admin | Updated: May 16, 2015 00:46 IST

निर्णय निवडणूक आयोगाच्या विचाराधीन.

अकोला: ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर मतमोजणी दुसर्‍या दिवशी तालुक्याच्या ठिकाणी उ पविभागीय अधिकारी व तहसीलमध्ये करण्यात येते. मात्र, यामध्ये बदल करून ग्रामपंचायतचे मतदान झाल्यानंतर मतमोजणी त्याच दिवशी व त्याच केंद्रावर करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाच्या विचाराधीन आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम तहसील कार्यालयातून चालतो. वर्ग २ किंवा वर्ग ३ मधील अधिकारी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहतात. निवडणूक आयोगाने मात्र आता यामध्ये बदल करण्याचे ठरविले आहे. यापुढे या निवडणुकीचा कार्यक्रम ग्रामपंचायतमधूनच चालविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाच्या विचाराधीन आहे. यानुसार ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाइन अर्ज सादर करतील. त्यानंतर या अर्जाची एक प्रत ग्रामपंचायतमध्ये असलेल्या निवडणूक निर्णय अधिकार्‍याला देतील. हे अधिकारी उमेदवाराचा अर्ज मिळाल्याचे ऑनलाइन वरिष्ठ कार्यालयाकडे कळव तील. त्यानंतर मतदानाच्या दिवशी गावात मतदान केंद्रावर निवडणूक अधिकारी उपस्थित राहतील. मतदान केंद्रावर मतदान झाल्यानंतर त्याच ठिकाणी मतमोजणी केली जाईल व त्याच दिवशी निकाल घोषित करण्यात येईल. एकाच दिवसात मतदान व मतमोजणी घेण्याचा शासनाचा निर्णय असला तरी याचे दुष्परिणामही अधिक असल्याचे अधिकारी- कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. मतदान केंद्रावर मतदानाची वेळ सायंकाळी ५ वाजेपर्यंत असली तरी कधीकधी रात्री ८ वाजेपर्यंत मतदान चालते. त्यानंतर निकाल ऐकण्यासाठी मतदान केंद्रांवर उमेदवारांच्या सर्मथकांची गर्दी असते. रात्री निकाल जाहीर करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जिल्ह्यात एकाचवेळी अनेक गावांमध्ये निवडणुका असल्यामुळे पोलीस बंदोबस्तातही र्मयादा येऊ शकतात. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा अनेक कर्मचारी व अधिकारी विरोध करीत आहेत.