सावकाराने बळकावलेली जमीन ताब्यात द्या!

By Admin | Updated: May 29, 2014 00:00 IST2014-05-28T23:30:03+5:302014-05-29T00:00:16+5:30

अवैध सावकाराने फसवणूक करून बळकावलेली शेतजमीन ताब्यात देण्यात यावी, या मागणीसाठी बाळापूर तालुक्यातल्या दधम येथील एका आदिवासी विधवा महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

Grab the land acquired by the lender! | सावकाराने बळकावलेली जमीन ताब्यात द्या!

सावकाराने बळकावलेली जमीन ताब्यात द्या!

अकोला : अवैध सावकाराने फसवणूक करून बळकावलेली शेतजमीन ताब्यात देण्यात यावी, या मागणीसाठी बाळापूर तालुक्यातल्या दधम येथील एका आदिवासी विधवा महिलेने बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
पातूर तालुक्यातल्या चोंढी येथील अवैध सावकार दीपक जैन यांनी फसवणुकीतून शेतजमीन बळकावून ताबा केला आहे. शेतजमिनीवरील त्याचा ताबा काढून जमीन ताब्यात द्यावी, फसवणूक केल्यामुळे कोर्टात जावे लागते, त्यामुळे आलेला खर्च सात लाख रुपये गैरअर्जदाराकडून देण्यात यावे, तसेच गैरअर्जदाराकडून कुटुंबीयांच्या जीवित्वास धोका असल्याने संरक्षण देण्याची व्यवस्था करावी इत्यादी मागण्यांसाठी दधम येथील आदिवासी विधवा महिला कुसुम सहदेव जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धारही या महिलेने निवेदनात नमूद केला आहे.

Web Title: Grab the land acquired by the lender!