शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्या, दुष्काळाच्या मुद्यावर सरकार संवेदनाहीन

By admin | Updated: August 27, 2015 00:55 IST

सरकार निव्वळ घोषणाबाज असल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा पत्रकार परिषदेत आरोप.

अकोला: राज्यातील सध्याचे सरकार निव्वळ घोषणाबाज सरकार असल्याचे सांगत, शेतकरी आत्महत्या आणि दुष्काळाच्या मुद्यावर राज्य सरकार संवेदनाहीन आहे, असा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा अँड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी येथे केला. अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील सध्याचे सरकार निव्वळ घोषणाबाज सरकार असून, नवीन काहीच या सरकारकडून करण्यात आले नाही. अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत राज्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटना वाढत आहेत; मात्र शेतकर्‍यांचे प्रश्न आणि दुष्काळी परिस्थितीच्या मुद्यावर राज्य सरकार दिशाहीन असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील दुष्काळी परिस्थिती व शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर महाराष्ट्र लोकशाही आघाडी आणि डावी लोकशाही आघाडीच्यावतीने आंदोलन छेडले जाणार आहे. त्यामध्ये २ सप्टेंबर रोजी सर्व डाव्या संघटना आणि कामगार संघटनांच्यावतीने संप पुकारण्यात आला आहे. तसेच येत्या हंगामात पेरणीसाठी शेतकर्‍यांना मोफत बियाणे पुरविणे, खताला सबसिडी, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, दुष्काळी भागात जनावरांसाठी छावण्या उभारणे, शेतीमालाची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत करण्यात यावी, इत्यादी मुद्यांवर महाराष्ट्र लोकशाही आघाडी आणि डावी लोकशाही आघाडी आंदोलन करणार असल्याचे अँड. आंबेडकर यांनी सांगितले. राज्यातील भाजपचे सरकार निव्वळ घोषणाबाज सरकार असल्याची टीका करीत, राज्यात सरकारला आर्थिक आणीबाणी आणायची आहे, तसाच जाणीवपूर्वक सरकारचा सध्या कारभार सुरू असून, आर्थिक आणीबाणी लावल्याशिवाय पर्याय नाही, असा पर्याय ठेवण्याची तयारी सरकारकडून सुरू आहे. त्यामुळे सरकारची लोकशाहीसोबत बांधीलकी आहे की नाही, याबाबत शंका आहे, असा आरोप अँड. आंबेडकर यांनी केला. या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, भारिप-बमसंचे जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम साबळे, कृषी सभापती रामदास मालवे, बालमुकुंद भिरड, जिल्हा सरचिटणीस अश्‍वजित शिरसाट, मनपा गटनेता गजानन गवई, जिल्हा परिषद सदस्य विजय लव्हाळे, बळीराम चिकटे, डॉ.प्रसन्नजित गवई, शेख साबीर उपस्थित होते.