शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कापसाला अग्रिम बोनस देण्यावर शासन अनुकूल

By admin | Updated: November 24, 2014 00:02 IST

कृषिमंत्री एकनाथ खडसे यांचा कापूस उत्पादकांना दिलासा; बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी कठोर पावले.

राजरत्न सिरसाट/अकोलायंदा कापसाचे उत्पादन घटले हे खरे असून, कापसाला मिळणारे हमीदर प्रतिक्विंटल ४0५0 रुपयांपर्यंतच आहेत. त्यामुळे कापसाला अग्रिम बोनस देण्यासाठी राज्य शासन अनुकूल असल्याची माहिती राज्याचे महसूल तथा कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांनी रविवारी येथे दिली. ना. खडसे अकोला दौर्‍यावर आले असताना त्यांनी शेतकर्‍यांप्रती असलेली शासनाची भूमिका खास ह्यलोकमतह्णशी बोलताना स्पष्ट केली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे भाव पडले असल्याने देशांतर्गत कापसाच्या भावावर त्याचे परिणाम जाणवत आहेत. शेतकर्‍यांचा कापूस बाजारात कमी भावाने विकला जात आहे. याच पृष्ठभूमीवर शासनाने तातडीने निर्णय घेत, कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाद्वारे राज्यात हमी दराने कापूस खरेदी केंद्रं सुरू केली आहेत. या केंद्रांद्वारे हमी भावाने कापसाची खरेदी केली जात असली तरी शासन शेतकर्‍यांच्या बाजूने असल्यानेच कापूस उत्पादक शेतकर्‍यांना अग्रिम बोनस देण्याबाबत अनुकूल असून, याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार असल्याचे ना. खडसे यांनी सांगितले.सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. गतवर्षीची अतवृष्टी आणि यावर्षी झालेला कमी पाऊस, यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. या शेतकर्‍यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचारविनिमय केला जाणार असून, बोगस सोयाबीन बियाणे विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाकडून कठोर पावले उचलण्यात येत असून, याबाबत कायदाच तयार केला जाणार आहे. शेतकर्‍यांना अशा पद्धतीने गंडविणार्‍यांची गय केली जाणार नसल्याचे सांगून, यापुढे बोगस बियाणे विकण्यावर फौजदारी स्वरू पाचे गुन्हे दाखल करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात हजारो शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापुढे शेतकर्‍यांवर आत्महत्येसारखा प्रसंग ओढवूच नये, यासाठी शासन प्रयत्नशील असून, शेतकर्‍यांसाठी अनेक उपाययोजना राबविण्यात येतील. कृषी विभागाच्या योजना शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत नव्हे, तर शेतात कशा पोहोचतील, यावर जोर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.फोटो : २४ सीटीसीएल 0७