गोसेवक संमेलन भक्तिभावात संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:53 IST2020-12-04T04:53:05+5:302020-12-04T04:53:05+5:30

आदर्श गोसेवा प्रकल्पाचे अध्यक्ष सुभाष जैन यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या संमेलनात रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर, स्वागताध्यक्ष आशीष बाहेती, ...

Gosevak Sammelan held in devotion | गोसेवक संमेलन भक्तिभावात संपन्न

गोसेवक संमेलन भक्तिभावात संपन्न

आदर्श गोसेवा प्रकल्पाचे अध्यक्ष सुभाष जैन यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या संमेलनात रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर, स्वागताध्यक्ष आशीष बाहेती, प्रमुख पाहुणे म्हणून रमेश चांडक, विहिपचे क्षेत्रीय गोरक्षा प्रमुख भाऊराव कुदळे, ॲड. मोतीसिंह मोहता, रा.स्व. संघाचे विदर्भ प्रांत गोसेवा प्रमुख सुनील सूर्यवंशी, विजय शर्मा, चेतन वेरूळकर, ॲड. अमोल अंधारे, प्रा. विवेक बिडवई, सूरज भगेवार, विहिंपचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोढिया, प्रकाश घोगलिया, जिल्हा प्रकाश वाघमारे, यजमान गिरीश तोष्णीवाल, गायत्री परिवाराचे डॉ. सुरेश राठी, गोसेवक गोपाल नागपुरे, परमजितसिह घुमन, मधुवत्सल गोसेवा बहूद्देशीय प्रतिष्ठानचे सर्वसेवाधिकारी मसने महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गोसेवा कार्यात सहकार्य करणारे गोसेवक गोपाल नागपुरे, परमजितसिह घुमन, राजेश असोलकर, पवन शेळके, योगेश बाहेती, मनोहर सातव, विजय गावंडे, विठ्ठल लोहनकर, डॉ संतोष आंबुसकर, नारायण असोलकर, ज्ञानेश्वर जावरकार, शुभम तांगडे, राजू दीपके, राहुल बाठे, सोपान असोलकर समवेत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा स्मृतिचिन्हे प्रदान करून गौरव करण्यात आला. प्रास्ताविक प्रकाश वाघमारे यांनी संचालन मसने महाराज यांनी तर आभार डॉ. सुरेश राठी यांनी मानले.

Web Title: Gosevak Sammelan held in devotion