टोळीने गुन्हे करणारी दोन जणांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:18 IST2021-04-08T04:18:57+5:302021-04-08T04:18:57+5:30

पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांचा आदेश अकोला : पातूर शहरासह जिल्हाभरात टोळीने गुन्हे करणाऱ्या दोन जणांच्या टोळीला पोलीस अधीक्षक ...

The gang of two gangsters was deported for two years | टोळीने गुन्हे करणारी दोन जणांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार

टोळीने गुन्हे करणारी दोन जणांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार

पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांचा आदेश

अकोला : पातूर शहरासह जिल्हाभरात टोळीने गुन्हे करणाऱ्या दोन जणांच्या टोळीला पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशाने जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. आतापर्यंत पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने जिल्ह्यातील सुमारे २८ टोळ्यांना हद्दपार करण्यात आले आहे.

पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पातूर शहरातील रहिवासी विनोद राजू शेज्वाल वय २८ वर्षे व विशाल राजपूत के जीवन हे दोघे जण जिल्ह्याच्या विविध भागात टोळीने गुन्हे करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांना मिळाली. या माहितीवरून तिन्ही गुन्हेगारांवरील गुन्हेगारीची मालिका पाहता त्यांनी या दोघांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. यावरून पातूर पोलिसांनी या दोन गुन्हेगारांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांकडे सादर केली. पातूर पोलीस ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात या दोघांनीही टोळीने अनेक गुन्हे केल्याचे समोर आले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक तसेच त्यांना सुधारण्यासाठी वारंवार कारवाई करण्यात आली; मात्र दोन्ही गुन्हेगार पोलिसांच्या या कारवाईला जुमानत नसल्याने पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशाने या दोन्ही गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी हा आदेश बुधवारी दिला असून टोळीला जिल्ह्याच्या बाहेर काढण्यात आले आहे.

Web Title: The gang of two gangsters was deported for two years