शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘फन टार्गेट आॅनलाइन कसिनो’चा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 12:31 IST

​​​​​​​अकोला -खेड्यापाड्यांसह शहरातील तरुणांना ‘फन टार्गेट आॅनलाइन कसिनो’ नावाच्या अत्याधुनिक जुगाराने विळखा घातला आहे.

- सचिन राऊत

अकोला -खेड्यापाड्यांसह शहरातील तरुणांना ‘फन टार्गेट आॅनलाइन कसिनो’ नावाच्या अत्याधुनिक जुगाराने विळखा घातला आहे. आधीच्या जुगारात प्रत्येक तासाला सोडत निघायची; मात्र आता या आॅनलाइन कसिनोची सोडत दर मिनिटाला निघत आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तरुणांसह अनेक जण या मायाजाळात चांगलेच अडकले आहेत.जिल्ह्यातील बाभूळगाव येथे शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाचे प्रमुख तुषार नेवारे यांनी येथील आॅनलाइन कसिनोवर छापा टाकला. त्यांनी संगणकावरील एका अ‍ॅपद्वारे खेळण्यात येत असलेल्या फन टार्गेट गेम आॅनलाइन कसिनोचा पर्दाफाश केल्यानंतर या आॅनलाइन कसिनोने खेड्यापाड्यातील तरुणांना विळखाच घातल्याचे वास्तव समोर आले. संगणकावर एका गोलाकारात १० आकडे देण्यात आलेले आहेत. यामध्ये प्रत्येकाने त्याचा आकडा निवडावा व त्यावर पैसे लावावे, त्यानंतर या गोलाकारात घड्याळ्यात असलेल्या काट्याप्रमाणे काटे एक मिनीट फिरतात, त्यानंतर सदर काटा ज्या आकड्यावर थांबेल त्यांना परतफेड करण्यात येते तर उर्वरितांचे पैसे हा गेम चालविणारा घेतो. अशा प्रकारे दर मिनिटाला या आॅनलाइन कसिनोची सोडत संगणकावर होत असून, १०० रुपयांना एक हजार ते एक हजार ५०० रुपये देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या आॅनलाइन कसिनोमुळे जुगाराचे अत्याधुनिक स्वरूप सध्या वाऱ्यासारखे खेड्यात आणि शहरात पसरत असून, अनेकांना या आॅनलाइन गेमने भुरळ घातली आहे.

 एकाचवेळी हजारो लोक खेळतातनेटद्वारे कनेक्ट असलेला आॅनलाइन कसिनो एकाचवेळी हजारो लोक खेळतात. १० आकड्यांपैकी एक आकडा निवडावा लागतो. त्यानंतर संगणकाच्या स्क्रीनवर आॅनलाइन खेळ एक मिनीट चालतो. ज्यांचा आकडा निघतो, त्यांना चांगलीच परतफेड मिळते तर उर्वरित लोकांचे पैसे गेमचा संचालक व त्याचा मुख्य सूत्रधार या दोघांना मिळतात.  अ‍ॅपची विक्री; मात्र पासवर्ड गुलदस्त्यातवाशिममधील जमील नामक व्यक्ती आॅनलाइन कसिनोचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती आहे. तो या कसिनोचा अ‍ॅप संगणकात फीड करून देतो; मात्र या अ‍ॅपचा आयडी आणि पासवर्ड हा त्याच्याकडेच ठेवण्यात येतो. आॅनलाइन कसिनो हा खेळ चालविण्यासाठी खेड्यात व शहरात हिस्सेवाटीने मानसे ठेवण्यात आली आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाonlineऑनलाइन