बहुजन युवा शक्तीने काढला मोर्चा

By Admin | Updated: July 16, 2015 01:36 IST2015-07-16T01:36:03+5:302015-07-16T01:36:03+5:30

बहुजनांवरील हिंसाचाराला पायबंद घालण्याची मागणी.

Front of Bahujan Yuva Shakti removed | बहुजन युवा शक्तीने काढला मोर्चा

बहुजन युवा शक्तीने काढला मोर्चा

अकोला : राज्यात बहुजनांवरील जातीय हिंसाचार व अत्याचाराला पायबंद घालण्यात यावा आणि प्रक्षोभक विधाने करून जातीय तेढ निर्माण करणार्‍या कमलाकर कोते विरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी शिव, शाहू, फुले, आंबेडकर बहुजन युवा शक्ती जिल्हा शाखेच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राज्यातील बहुजन समाजावर होणारे जातीय हल्ले, अत्याचार व हिंसाचाराला प्रतिबंध करण्यात यावा, शिर्डी येथील मोर्चेकरी व आंबेडकरी समुदायाच्या विरोधात टिप्पणी करणार्‍या कमलाकर कोते विरोधात जातीय तणाव निर्माण करण्याच्या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात यावे, सागर शेजवळ हत्याकांड प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे व त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य व पुनर्वसन करण्यात यावे व आरोपींना शिक्षा करण्यात यावी आणि सोशल मीडियावरील बहुजन महामानवांची होणारी विटंबना थांबविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा विकसित करण्यात यावी, या मागण्यांसाठी बहुजन युवा शक्ती जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांना सादर करण्यात आले.

Web Title: Front of Bahujan Yuva Shakti removed