शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्ण सिंचन विहिरींच्या कामांचा मार्ग मोकळा!

By admin | Updated: December 23, 2014 00:46 IST

कामे पूर्ण करण्यासाठी ८.५0 कोटी.

संतोष येलकर / अकोला: धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत जिल्ह्यात सिंचन विहिरींची अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यासाठी शासनाकडून ८ कोटी ५0 लाख ९८ हजारांचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २ डिसेंबर रोजी हा निधी जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाला वितरित केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन विहिरींची अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये सन २00९ पासून धडक सिंचन विहीर योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यातील १ हजार ५0४ सिंचन विहिरींची कामे गत तीन-चार वर्षांपासून अपूर्ण आहेत. धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत विहिरींची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी, या विहिरींच्या कामांकरिता लाभार्थी शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या अनुदानात दीड लाखावरून अडीच लाखापर्यंत अनुदान देण्याचा निर्णय गतवर्षी फेब्रुवारीमध्ये शासनामार्फत घेण्यात आला. त्यानुसार जिल्हय़ातील १ हजार ५0४ सिंचन विहिरींची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी ८ कोटी ५0 लाख ९८ हजारांचा निधी शासनामार्फत गत २८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयो विभागाला प्राप्त झाला. प्राप्त झालेला हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाला वितरित करण्यात आला. लघुसिंचन विभागामार्फत हा निधी लवकरच पंचायत समिती स्तरावर वितरित करण्यात येणार असून, पंचायत समित्यांकडून लाभार्थी शेतकर्‍यांना अनुदान वितरित केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन विहिरींची अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.