शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी ४ हजार अधिकारी-कर्मचारी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2017 02:30 IST

५८७ मतदान केंद्रांवर होणार मतदान; आयुक्तांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती

अकोला, दि. १७-महापालिका निवडणुकीच्या मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून ४ हजार अधिकारी-कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २१ फेब्रुवारी रोजी ५८७ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार असून २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती शुक्रवारी महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेची चौथी सार्वत्रिक निवडणूक यंदा विविध बाबींनी ऐतिहासिक ठरणार आहे. महापालिका क्षेत्राची हद्दवाढ होऊन नवीन २४ गावांचा मनपात समावेश झाला. त्यामुळे प्रभागांचे क्षेत्रफळ व नगरसेवकांच्या संख्येतदेखील वाढ झाली. निवडणूक प्रक्रिया पारदश्री व शांतपणे पार पडावी, यासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, सहायक अधिकार्‍यांसह इतर कर्मचारी अशा एकूण ४ हजार अधिकारी-कर्मचार्‍यांची नियुक्ती केल्याची माहिती मनपा आयुक्त अजय लहाने यांनी दिली. २१ फेब्रुवारी रोजी ५८७ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार असल्याने २0 फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंंत सर्व अधिकारी-कर्मचारी मतदान केंद्रावर नियुक्त होतील. २३ फेब्रुवारी रोजी खदान परिसरातील शासकीय गोदाम येथे मतमोजणी होणार असून मतदानाच्या दिवशीच (२१ फेब्रुवारी) सर्व इव्हीएम शासकीय गोदामावर पोहोचण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रांच्या बाहेर १00 मीटर अंतरावर राजकीय पक्षांच्या बुथ प्रमुखांना बुथ उघडता येतील. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदारांना माहिती देण्यासाठी उभारलेल्या मंडपात केवळ दोन व्यक्तींना (कार्यकर्ते) बसण्याची मुभा राहील. त्यापेक्षा जास्त कार्यकर्ते आढळल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे यावेळी आयुक्त लहाने यांनी स्पष्ट केले. मतदानाच्या दिवशी पारदश्री प्रक्रियेसाठी ४0 क्षेत्रीय अधिकार्‍यांची नियुक्ती केली असून त्यांच्या दिमतीला ४0 कॅमेरामन नियुक्त करण्यात आले आहेत. शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी अकोलेकरांनी मोठय़ा संख्येने मतदान करण्याचे आवाहन यावेळी आयुक्त अजय लहाने यांनी केले. पत्रकार परिषदेला मनपा उपायुक्त तथा नोडल अधिक ारी समाधान सोळंके, सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले, सहायक आयुक्त जीतकुमार शेजव, प्रज्ञा खंदारे आदी उपस्थित होते.