सरपंचपतीकडून माजी सरपंचास मारहाण

By Admin | Updated: May 29, 2014 23:23 IST2014-05-29T20:52:37+5:302014-05-29T23:23:11+5:30

बार्शीटाकळी तालुक्यातील सावरखेड येथील सरपंचाच्या पतीने माजी सरपंचास मारहाण; गुन्हा दाखल

Former sarpanchas assault by Sarpanchapati | सरपंचपतीकडून माजी सरपंचास मारहाण

सरपंचपतीकडून माजी सरपंचास मारहाण

पिंजर:बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर पोलिस स्टेशनांतर्गत येत असलेल्या सावरखेड येथील सरपंच यांच्या पतीने माजी सरपंचास विकास कामांच्या मुद्यावरून शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना बुधवार, २८ मेच्या रात्री घडली. पिंजर पोलिसांनी गुरुवारी परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, सावरखेड येथील ग्रामपंचायतमध्ये २८ मे रोजी मासिक सभा पार पडली. माजी सरपंच बंडू धोंडूजी आमटे व गावकर्‍यांनी सभेमध्ये गावातील प्रमुख समस्या मांडल्या. त्यानंतर रात्री नऊ वाजताचे सुमार बंडू आमटे व त्यांचे सहकारी हापशीच्या पाण्याबाबत चर्चा करीत असताना. सरपंच वंदना देशमुख यांचे पती बाळू देशमुख व त्यांचे काही सहकारी तेथे आले. त्यांच्यात शाब्दीक खडाजंगी होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. याबाबत पिंजर पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी करण्यात आल्या आहेत. बाळू देशमुख यांनी गुरुवारी सकाळी माजी सरपंच बंडू आमटे यांच्याविरुद्ध शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. तर आमटे यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ३२३, ५०४ व ५०६ अन्वये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.  

Web Title: Former sarpanchas assault by Sarpanchapati