शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांपासून अविरत सुरू आहे किशोरदांचा ‘कारवॉ’

By admin | Updated: August 4, 2014 00:19 IST

दिनविशेष : गायक किशोरकुमार यांची आज जयंती

वाशिम : आपल्या आवाजाच्या जादूने सर्वांना भूरळ घालत अजरामर झालेल्या किशोरदांचा कारवाँ आजही सुरुच आहे. त्यांच्या कारव्याचे घटक बनून त्यांच्या गितातून प्रेरणा घेणार्‍या स्वरांजली कला मंचच्या हरहून्नरांनी त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून गेल्या ५ वर्षापासून वाशिममध्येही 'कारवाँ किशोर का'च्या नावाने किशोरदांच्या आठवणींना उजाळा देण्यासह नवोदीत गायकांना मंच उपलब्ध करुन देण्याचा वसा घेतला आहे. ज्यांच्या गितांना गायनाला नवं रुप दिलं अशा किशोरदांचा गाणं न गुणगुणनारा व्यक्ती सापडणं मुश्कील. ज्याला गायनाचा छंद आहे तो आपल्या गायनाची सुरुवातच किशोरदांच गाण्यान करतो अन् ज्याचा सुर तालाशी काही संबंध नाही असाही किशोरदांच गाण गुणगुणन्याचा प्रयत्न करतो यातच किशोरदांच्या गाण्याच महत्व दडलेलं आहे. अशा अजरामर गायकाच्या जयंतीचे औचित्य साधून गेल्या पाच वर्षापासून वाशिम येथील स्वरांजली कला मंच व आर. के. गृपच्या समन्वयातून 'कारवाँ किशोर का', या गीतस्पर्धेचे आयोजन केले जाते. यातील अनियमीतता दूर करुन नव्या जोमाने स्वरांजली कला मंच गत पाच वर्षापासून किशोरदांच्या जयंतीच्या औचित्याने त्यांना समर्पीत कार्यक्रचे आयोजन करतो आहे. यासाठी स्वरांजली कला मंचचे डॉ. संदेश राठोड, डॉ. विलास इंगळे, बाळू मुठाळ, कुणाल तायडे, रविंद्र डोंगरदिवे, जनता बँकेचे राजेश अग्रवाल आदी कसोशिने प्रयत्न करतात. दरवेळी किशोरदांच्या जयंतीदिनी नवोदितांची ऑडीशन घेवून त्यानंतर ..कारवाँ किशोर का च्या माध्यमातून नवोदीतांना आपल्या कलागुणांना प्रस्तूत करण्याची संधी दिली जाते. यावेळी ४ ऑगस्ट या किशोरदांच्या जयंतीदिनी नवोदीतांची ऑडिशन होणार असून त्यांनंतर १६ ऑगस्टला नवोदीत आपल्या कलेचे सादरिकरण करणार आहेत. दरवर्षी किमान ४0 ते ५0 नवोदीत गायक कारवाँ किशोर कां साठी ऑडीशन देतात. त्यापैकी किमान २५ ते ३0 जणं दरवर्षी मुख्य स्पर्धेत सहभागी होतात. त्यामधून दरवर्षी तीन मुख्य विजेते व दोन जणांना प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाते. स्वरांजली कला मंच गायनाला आयाम देणार्‍या सर्वच गायकांच्या आठवणींना उजाळा देण्याचे काम करत आहे. गतवर्षी मन्ना डेंच्या आठवणीना गायनाच्या माध्यमातून उजाळा देत श्रोत्यांना आवाजाने अजरामर झालेल्या आणखी एका गायकाच्या आठणीत रमण्याची संधी स्वरांजलीच्या शिलेदारांनी उपलब्ध करुन दिली होती.