शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अकोला जिल्ह्यातील पाच नायब तहसीलदारांना पदोन्नती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 15:34 IST

जिल्ह्यातील पाच नायब तहसीलदारांना तहसीलदार संवर्गात पदोन्नती देण्यात आली.

अकोला: अमरावती विभागातील २४ नायब तहसीलदारांना तहसीलदार संवर्गात पदोन्नती देण्यात येत असल्याचा आदेश शासनाच्या महसूल व वन खात्यामार्फत १३ सप्टेंबर रोजी काढण्यात आला असून, त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील पाच नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती देण्यात आली आहे.जिल्ह्यातील पाच नायब तहसीलदारांना तहसीलदार संवर्गात पदोन्नती देण्यात आली असून, रिक्त पदांवर पदस्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये अकोला तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना अकोला येथे अन्न धान्य वितरण अधिकारी, बार्शीटाकळीचे नायब तहसीलदार यांना अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे तहसीलदार म्हणून पदस्थापना देण्यात आली. अकोट उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार एम.ए. माने यांना चिखलदरा येथे तहसीलदार म्हणून, मूर्तिजापूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार व्ही.आर. फरतारे यांना तिवसा येथे तहसीलदार म्हणून आणि अकोला तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार श्यामला खोत यांना बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात अधीक्षक म्हणून पदस्थापना देण्यात आली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात तीन नवे तहसीलदार!तीन नायब तहसीलदारांची पदोन्नतीने अकोला जिल्ह्यात तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील नायब तहसीलदार के.व्ही. गावंडे यांची अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात नझूल तहसीलदार म्हणून, एन.टी. लबडे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात खरेदी अधिकारी म्हणून आणि बुलडाणा जिल्ह्यातील नायब तहसीलदार एम.के.पागोरे यांची पदोन्नतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.दोन तहसीलदारांची बदली!गत ९ सप्टेंबर रोजीच्या शासन आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागाचे तहसीलदार आशीष बिजवल यांची नागपूर येथे महानगरपालिका उपआयुक्त म्हणून आणि नझूल तहसीलदार मनोज लोणारकर यांची नागपूर येथे ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. आशीष बिजवल यांची बदली झाल्याने रिक्त जागेवर मात्र अद्याप नवीन तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली नाही.

 

टॅग्स :AkolaअकोलाRevenue Departmentमहसूल विभाग