..अखेर छेडखानी प्रतिबंधक पथके कार्यान्वित

By Admin | Updated: September 5, 2014 01:35 IST2014-09-05T01:35:18+5:302014-09-05T01:35:18+5:30

अकोला शहरातील छेडखानी प्रतिबंधक पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत.

Finally implemented the Prohibition Control Squad | ..अखेर छेडखानी प्रतिबंधक पथके कार्यान्वित

..अखेर छेडखानी प्रतिबंधक पथके कार्यान्वित

अकोला: शहरातील वाढत्या विनयभंग, छेडखानीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मिणा यांनी स्वत: पुढाकार घेऊन शहरातील सातही पोलिस ठाण्यांतर्गत छेडखानी प्रतिबंधक पथके नियुक्त केली आहेत आणि या पथकांच्या कामास सुरुवातसुद्धा झाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्गाच्या परिसरामध्ये विनयभंग, छेडखानीच्या घटना सातत्याने घडत आहेत. यापूर्वी छेडखानीचे प्रकार रोखण्यासाठी तत्कालिन पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी छेडखानी प्रतिबंधक पथक सुरू केले होते. या पथकाच्या प्रमुख निलंबि त एपीआय नयना पोहेकर होत्या; परंतु एसीबीच्या जाळय़ात अडकल्याने त्यांचे हे पद गेले. त्यानंतर एपीआय शुभांगी दिवेकर यांच्याकडे पथकाची जबाबदारी देण्यात आली; परंतु त्या सुद्धा पथकाला न्याय देऊ शकल्या नाहीत. त्यामुळे छेडखानी प्रतिबंधक पथक जवळपास संपुष्टातच आले होते. त्यामुळे शहरात छेडखानी, विनयभंगाच्या प्रकारांना ऊत आला. दररोज शहरातील अनेक भागांमध्ये महिला, तरुणींची टारगट युवकांकडून छेड काढली जाते. त्यांचा विनयभंग केला जातो. याबाबत लोकमत अनेकदा वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत, तत्कालिन पोलिस अधीक्षकांनी मोबाईल पेट्रोलिंग मोहीम सुरू केली. परंतु काही दिवसांमध्येच ही मोहीमसुद्धा थंड पडली. नव्यानेच रुजू झालेले पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या पत्रपरिषदेत लोकमतने छेडखानी प्रतिबंधक पथकाचा मुद्दा उचलून धरला होता.

 
** पथकामध्ये राहतील तीन महिला कर्मचारी
प्रत्येक पोलिस ठाण्यांतर्गत सुरू करण्यात आलेल्या छेडखानी प्रतिबंधक पथकामध्ये एक अधिकारी व दोन महिला कर्मचार्‍यांचा समावेश राहणार आहे. परिस्थिती पाहून पथकामध्ये कर्मचार्‍यांची संख्या वाढविली जाईल.
 

Web Title: Finally implemented the Prohibition Control Squad