शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
4
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
5
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
6
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
7
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
8
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
9
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
10
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
11
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
12
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
13
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
14
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
15
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
16
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
17
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
18
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
19
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
20
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
Daily Top 2Weekly Top 5

नगररचना विभागातून फाइल गहाळ: कारवाई नाहीच; सेनेचा बार फुसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 10:59 IST

आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या आप्तेष्टांची फाइल गहाळ झाल्याचा मुद्दा मनपातील गटनेता राजेश मिश्रा यांनी स्थायी समितीच्या सभेत उपस्थित केला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेच्या नगररचना विभागातून शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या आप्तेष्टांची फाइल गहाळ झाल्याचा मुद्दा मनपातील गटनेता राजेश मिश्रा यांनी स्थायी समितीच्या सभेत उपस्थित केला होता. प्रशासनाने कारवाई न केल्यास नगररचना विभागाला कुलूप ठोकण्याचा इशारा मिश्रा यांनी दिल्यानंतर उपायुक्त वैभव आवारे यांनी २४ तासांच्या आत दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाचा प्रशासनाला विसर पडला असून, शिवसेनेचाही कुलूप ठोकण्याचा बार फुसका ठरल्याचे समोर आले आहे.महापालिकेत २८ जुलै रोजी स्थायी समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी नगररचना विभागातून बांधकाम परवानगीसाठी सादर केलेल्या फायली गहाळ होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. शिवसेनेचे आ. गोपीकिशन बाजोरिया यांच्या नातेवाइकाने बांधकाम परवानगीसाठी सादर केलेली फाइल गहाळ झालीच कशी, याप्रकरणी दोषी आढळून येणाºया कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने काय कारवाई केली, असे विविध प्रश्न राजेश मिश्रा यांनी उपस्थित केले होते. फाइल गहाळ झाल्याप्रकरणी मनपा प्रशासनाने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केल्याची माहिती मनपा उपायुक्त वैभव आवारे यांनी सभागृहामध्ये दिली होती. त्यावर एक महिना उलटून गेल्यावरही प्रशासनाकडून नगररचना विभागातील कर्मचाºयांवर काय कारवाई केली, असा प्रश्न मिश्रा यांनी उपस्थित करीत प्रशासनाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. प्रशासनाने तातडीने दोषी कर्मचाºयावर कारवाई न केल्यास नगररचना विभागाला कुलूप लावण्याचा इशारा राजेश मिश्रा यांनी दिला असता, उपायुक्त आवारे यांनी २४ तासांच्या आत दोषी कर्मचाºयावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. आजपर्यंतही प्रशासनाने दोषी कर्मचाºयांवर कोणतीही कारवाई केली नाही, हे येथे उल्लेखनीय.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका