शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
3
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
4
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
5
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
6
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
7
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
8
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
10
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
11
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
12
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
13
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
14
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
15
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
16
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
17
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
18
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
19
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
20
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

नराधम बाप दोन वर्षांपासून करीत होता मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 10:52 IST

४० वर्षीय पिता त्याच्या १४ वर्षीय मुलीवर गत दोन वर्षांपासून अत्याचार करीत होता.

ठळक मुद्देशाळेला सुटी असली व घरातील सदस्य शेतात गेल्यानंतर हा नराधम मुलीवर अत्याचार करीत होता.लैंगिक छळ सहन न झाल्याने तिने थेट माना पोलिसांत धाव घेऊन आपबिती कथन केली. मुलीने आईला सांगितले; मात्र वडील मुलीबरोबर असे करत नसतात म्हणून आईने याकडे दुर्लक्ष केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर/कुरूम : पित्यानेच त्याच्या अल्पवयील शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याची घटना १० डिसेंबर रोजी मूर्तीजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या एका गावात उघडकीस आली. बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.४० वर्षीय पिता त्याच्या १४ वर्षीय मुलीवर गत दोन वर्षांपासून अत्याचार करीत होता.शाळेला सुटी असली व घरातील सदस्य शेतात गेल्यानंतर हा नराधम मुलीवर अत्याचार करीत होता. पित्याकडून होत असलेला लैंगिक छळ सहन न झाल्याने तिने थेट माना पोलिसांत धाव घेऊन आपबिती कथन केली. मुलीच्या फिर्यादीवरून माना पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, एसडीपीओ डॉ.अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संजय खंडारे करीत आहेत.पोलिसांच्या मोहिमेतून मिळाली प्रेरणापोलिसांच्या वतीने १४ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबरदरम्यान मूर्तिजापूर तालुक्यातील प्रत्येक शाळेत बालकांवर होणाºया लैंगिक अत्याचारविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच मुलींनी न घाबरता सरळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्याचे आवाहन केले होते. पीडित मुलीला या कार्यक्रमातून बापाविरुद्ध तक्रार देण्याची प्रेरणा मिळाली. तिला तिच्या मैत्रिणीने खंबीरपणे साथ दिली.

आईने केले दुर्लक्ष गेल्या दोन वर्षांपासून नराधम बाप मुलीवर अत्याचार करीत होता. याविषयी मुलीने आईला सांगितले; मात्र वडील मुलीबरोबर असे करत नसतात म्हणून आईने याकडे दुर्लक्ष केले. पीडितेच्या आईने वेळीच दखल घेतली असती तर प्रकार काही महिन्यांपूर्वीच थांबला असता; मात्र पीडितेच्या आईने मुलीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने नराधम बापाची हिंमत वाढली. त्याने गेल्या काही दिवसांपासून अत्याचार वाढविल्याने मुलगी त्रस्त झाली होती. १० डिसेंबर रोजी पीडित मुलीने माना पोलीस स्टेशन गाठून पोलिसांसमोर आपबिती कथन केली.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार