नराधम बाप दोन वर्षांपासून करीत होता मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 10:52 IST2019-12-11T10:49:24+5:302019-12-11T10:52:18+5:30

४० वर्षीय पिता त्याच्या १४ वर्षीय मुलीवर गत दोन वर्षांपासून अत्याचार करीत होता.

Father was abusing his girl from two years in Akola | नराधम बाप दोन वर्षांपासून करीत होता मुलीवर अत्याचार

नराधम बाप दोन वर्षांपासून करीत होता मुलीवर अत्याचार

ठळक मुद्देशाळेला सुटी असली व घरातील सदस्य शेतात गेल्यानंतर हा नराधम मुलीवर अत्याचार करीत होता.लैंगिक छळ सहन न झाल्याने तिने थेट माना पोलिसांत धाव घेऊन आपबिती कथन केली. मुलीने आईला सांगितले; मात्र वडील मुलीबरोबर असे करत नसतात म्हणून आईने याकडे दुर्लक्ष केले.

लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर/कुरूम : पित्यानेच त्याच्या अल्पवयील शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याची घटना १० डिसेंबर रोजी मूर्तीजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या एका गावात उघडकीस आली. बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
४० वर्षीय पिता त्याच्या १४ वर्षीय मुलीवर गत दोन वर्षांपासून अत्याचार करीत होता.शाळेला सुटी असली व घरातील सदस्य शेतात गेल्यानंतर हा नराधम मुलीवर अत्याचार करीत होता. पित्याकडून होत असलेला लैंगिक छळ सहन न झाल्याने तिने थेट माना पोलिसांत धाव घेऊन आपबिती कथन केली. मुलीच्या फिर्यादीवरून माना पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, एसडीपीओ डॉ.अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संजय खंडारे करीत आहेत.

पोलिसांच्या मोहिमेतून मिळाली प्रेरणा

पोलिसांच्या वतीने १४ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबरदरम्यान मूर्तिजापूर तालुक्यातील प्रत्येक शाळेत बालकांवर होणाºया लैंगिक अत्याचारविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच मुलींनी न घाबरता सरळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्याचे आवाहन केले होते. पीडित मुलीला या कार्यक्रमातून बापाविरुद्ध तक्रार देण्याची प्रेरणा मिळाली. तिला तिच्या मैत्रिणीने खंबीरपणे साथ दिली.


आईने केले दुर्लक्ष
 गेल्या दोन वर्षांपासून नराधम बाप मुलीवर अत्याचार करीत होता. याविषयी मुलीने आईला सांगितले; मात्र वडील मुलीबरोबर असे करत नसतात म्हणून आईने याकडे दुर्लक्ष केले.
 पीडितेच्या आईने वेळीच दखल घेतली असती तर प्रकार काही महिन्यांपूर्वीच थांबला असता; मात्र पीडितेच्या आईने मुलीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने नराधम बापाची हिंमत वाढली. त्याने गेल्या काही दिवसांपासून अत्याचार वाढविल्याने मुलगी त्रस्त झाली होती. १० डिसेंबर रोजी पीडित मुलीने माना पोलीस स्टेशन गाठून पोलिसांसमोर आपबिती कथन केली.

Web Title: Father was abusing his girl from two years in Akola