शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

ओळखीच्या व्यक्तीने केले दागिने लंपास!

By admin | Updated: July 17, 2017 03:15 IST

२० दिवसांनी घटना उघडकीस: गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : परिचयातील व्यक्तीने सराफा दुकानामध्ये येऊन, दुकानदाराचे लक्ष विचलित करून दुकानातील ७८ ग्रॅम सोन्याचे दागिने २८ जून रोजी लंपास केले होते. दुकानदाराने सराफा दुकानातील सोन्याच्या दागिन्यांची शनिवारी मोजदाद केल्यावर दुकानातील दागिने लंपास झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला. राऊतवाडीत राहणारे ऐश्वर्य प्रकाश पाचकवडे (२४) यांचे सराफा दुकान आहे. २६ जून रोजी त्यांच्या दुकानामध्ये परिचयातील एक व्यक्ती आला. गप्पागोष्टी करताना, सराफा दुकानदाराचे लक्ष कामात असल्याचे पाहून त्याने दुकानातील ७८ ग्रॅम सोन्याचे दागिने गुपचूपपणे लंपास केले. आपल्या दुकानातून सोन्याचे दागिने लंपास झाल्याची जराशी कल्पना सराफा दुकानदाराला आली नाही; परंतु शनिवारी दुकानातील सोन्याच्या दागिन्यांची मोजदाद केली. तेव्हा दुकानातील २ लाख २९ हजार रुपये किमतीचे ७८ ग्रॅम सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात धाव घेतली. ठाणेदार अन्वर शेख यांनी त्यांच्याकडून २६ जून रोजी दुकानात कोण कोण आले होते, याची माहिती जाणून घेतली. काही व्यक्तींची नावे मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोळा चौकात राहणारा सचिन चौधरी याचे नाव समोर आले. २६ जून रोजी तो सराफा दुकानात आला होता. त्यानंतर तो गायब झाला. पोलिसांचा संशय वाढल्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. --