शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कचरा उचलण्यासाठी मुदतवाढ

By admin | Updated: May 8, 2015 01:49 IST

२३ लाखांच्या देयकाला मंजुरी.

अकोला: शहरातील कचरा उचलणार्‍या क्षितिज बेरोजगार सहकारी संस्थेला मुदतवाढही द्यायची नाही, अन् थकीत देयक ही अदा करायचे नाही, असे दुटप्पी धोरण मनपा प्रशासनाने राबवले. प्रशासनाच्या मनमानीला लोकमतने चव्हाट्यावर आणताच खडबडून जागे झालेल्या आयुक्तांनी उशिरा का होईना, संबंधित संस्थेला दोन महिन्याची मुदतवाढ देत २३ लाखांचे थकीत देयक गुरुवारी मंजूर केले. घनकचरा व्यवस्थापनाचा कंत्राट अमरावती येथील क्षितिज बेरोजगार सहकारी संस्थेला २00७ मध्ये देण्यात आला. प्रशासनाने नियमित देयक अदा न केल्याने थकबाकीचा आकडा तीन कोटींच्या घरात पोहोचला. यामुळे १९ ट्रॅ क्टरवरील चालक, सफाई कर्मचार्‍यांचे वेतन अदा करणे शक्य होत नसल्याने प्रशासनाकडे थकीत देयक अदा करण्याची मागणी कंत्राटदाराने लावून धरली. कचरा उचलण्याचा कंत्राट १५ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आला. त्यापूर्वीच प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापनासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदाराची नियुक्ती करणे भाग होते. तसे न करता प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवण्यास चालढकल केली. शिवाय रीतसर मुदतवाढ न देता थकीत देयकही अदा न करण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेमुळे कंत्राटदाराने कचरा उचलण्याचे काम बंद केले. यामुळे संपूर्ण शहरात घाण व कचर्‍याचे ढीग साचले. प्रशासनाच्या आडमुठय़ा धोरणावर लोकमतने प्रकाशझोत टाकताच गुरुवारी आयुक्त सोमनाथ शेटे यांनी दोन महिन्यांच्या मुदतवाढीसह २३ लाखांच्या देयकाला मंजुरी दिली.