शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

‘नवप्रकाश’ योजनेला मुदतवाढ

By admin | Updated: June 15, 2017 01:23 IST

अकोला : कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या कृषी ग्राहकांसह सर्व उच्च व लघुदाब वीज ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुरू असलेल्या नवप्रकाश योजनेला ३१ आॅगस्ट २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या कृषी ग्राहकांसह सर्व उच्च व लघुदाब वीज ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुरू असलेल्या नवप्रकाश योजनेला ३१ आॅगस्ट २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेत सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना वगळता इतर ग्राहकांनी जून २०१७ ते ३१ आॅगस्ट २०१७ या कालावधीत थकबाकीची मूळ रक्कम भरल्यास ८५ टक्के व्याज व विलंब आकाराची १०० टक्के रक्कम माफ होणार आहे. नवप्रकाश योजनेत थकबाकीची मूळ रक्कम भरणाऱ्या ग्राहकांना सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेस यामध्ये पूर्णपणे सूट देण्यात आली असून, ग्राहकांना कोणत्याही प्रतिज्ञापत्राची गरज लागणार नाही. शिवाय वीज जोडणीचा अर्ज ग्राहकांना कार्यालयात मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे. संकेतस्थळावर मिळणार माहितीयोजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांसाठी महावितरणच्या संकेतस्थळावर संबंधित ग्राहकाला थकीत देयकाची किती रक्कम भरावयाची आहे, याची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच जेथे इंटरनेटची सुविधा नसेल, अशा ग्राहकांना त्यांच्या थकबाकीच्या रकमेचा तपशील महावितरणच्या शाखा कार्यालयापासून ते मंडल कार्यालयात तातडीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या वीज ग्राहकांनी या नवप्रकाश योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.