शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

बैदपुर्‍यातील अतिक्रमण जमीनदोस्त

By admin | Updated: September 6, 2014 02:17 IST

अकोला मनपा अधिकार्‍यांवर दगडफेक; परिसरात तणाव.

अकोला : बैदपुर्‍यातील अतिक्रमित पानटपरी व काही दुकाने धाराशायी करण्यात आली. उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन पथकाने शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई केली. यादरम्यान, काही तरुणांनी मनपा अधिकार्‍यांवर दगडफेक केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. शहर पोलिस उपअधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी घटनास्थळावर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केल्याने राजकारण्यांचे मनसुबे उधळल्या गेले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉजपर्यंतचा रस्ता अतिक्रमकांनी गिळंकृत केला आहे. या मार्गावरून धड पायी चालणेदेखील कठीण झाले. या मार्गावरील बैदपुरा परिसरात चक्क रस्त्यावर वहिद खान नामक पानटपरी चालकाने अनेक वर्षांपासून ठिय्या मांडला होता. याच ठिकाणी गुड्ड पठाण नामक घोडे व्यावसायिकांनी त्यांचे घोडे बांधण्याची जागा रस्त्यावर उभारल्याने परिसरातील नागरिक प्रचंड वैतागले होते. महिनाभरापूर्वी अतिक्रमित पानटपरी हटविण्यासाठी गेलेल्या मनपा प्रशासनासह पोलिस प्रशासनाच्या कारवाईला कडाडून विरोध झाला होता. त्यानंतर पानटपरी चालकाने स्थानिक न्यायालयातून स्थगिती मिळवल्याने ही कारवाई अर्धवट पडून होती. ५ सप्टेंबर (शुक्रवार) रोजी वहिद खान यांच्या पानट परीवरील स्थगिती न्यायालयाने उठवल्याने मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी सायंकाळी या ठिकाणी धाव घेत, पानटपरीसह परिसरातील अ ितक्रमित दुकाने जमीनदोस्त केली. कारवाई सुरू असताना, परिसरातील काही युवकांनी मनपा अधिकार्‍यांवर दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला. ही बाब शहर पोलिस उपअधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करीत गर्दीला पांगविण्याचा प्रयत्न केला. पोलिस बंदोबस्तामुळे अनेकांचे मनसुबे पूर्ण होऊ शकले नाहीत. परिसरातील नागरिकांनी मात्र मनपाच्या कारवाईचे खुलेआम सर्मथन केले, हे विशेष. ** उपायुक्तांना धमकीपठाण नामक व्यावसायिक त्याचे घोडे बांधण्यासाठी रस्त्याचा वापर करीत होता. ही जागा मोकळी करून अतिक्रमित दुकान पाडल्यानंतर संतापलेल्या व्यावसायिकाने उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांना शिवीगाळ करीत ह्यपाहूनह्ण घेण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार पोलिसांच्या समक्ष पार पडला, हे येथे उल्लेखनीय.** तुम्ही सुरुवात केली, आम्ही शेवट करू!पठाण नामक घोडे व्यावसायिकाचे अतिक्रमित दुकान पाडल्यानंतर एका काँग्रेस नगरसेवकाने प्रशासनावर जातीभेद करीत असल्याचा आरोप लावला. कारवाई करण्याची तुम्ही सुरुवात केली, याचा शेवट आम्ही करू, असा इशारावजा धमकी संबंधित नगरसेवकाने उपायुक्तांना दिली.