शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक मतदारसंघ निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 12:29 IST

कोरोनामुळे शाळा, महाविद्यालयांना सुटी लागल्यामुळे उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.

- नितीन गव्हाळेअकोला: अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जून, जुलै महिन्यात होणार होती; परंतु आता कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक विभागाने मतदार नोंदणीची अधिसूचनासुद्धा काढली होती. आतापर्यंत विभागात ३४ हजारांवर शिक्षक मतदारांची नोंदणी झाली. इच्छुक उमेदवारसुद्धा प्रचाराला लागले होते; परंतु कोरोनामुळे शाळा, महाविद्यालयांना सुटी लागल्यामुळे उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.अमरावती शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांचा कार्यकाळ जूनमध्ये संपुष्टात येणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीची अधिसूचनासुद्धा काढली होती. शिक्षक संघटनांकडून मतदार नोंदणीस प्रारंभसुद्धा करण्यात आला. मतदारसंघातील पाचही जिल्ह्यांमधून आतापर्यंत ३४ हजार शिक्षक मतदारांनी नोंदणी केली आहे. इच्छुक उमेदवारांनी शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षक मतदारांसोबत संपर्क साधण्यास सुरुवात केली होती. दौऱ्यांचे नियोजन केले होते; परंतु अचानक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आणि शासनाने संचारबंदी लागू केली. शाळा, महाविद्यालयांना सुट्या जाहीर करण्यात आल्या. त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या प्रचारास ब्रेक लागला. शिक्षकांसोबत संपर्क होत नसल्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या नियोजनावर पाणी फेरल्या गेले आहे. कोरोनामुळे जूनमध्ये होणारी निवडणूकही लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाने अद्याप अधिसूचना जारी केली नाही. अमरावती विधान परिषद शिक्षक मतदारसंघाची गतवेळची निवडणूक जून महिन्यात झाली होती. त्यानुसार मतदारसंघामध्ये नव्याने जून, जुलै महिन्यात निवडणुकीची शक्यता वर्तविली जात होती; परंतु कोरोनामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हे उमेदवार राहणार रिंगणात!यंदाच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणामध्ये शिक्षक आघाडीचे विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांच्यासह विज्युक्टा व समविचारी संघटनांचे उमेदवार प्रा. डॉ. अविनाश बोर्डे, शिक्षक महासंघाचे शेखर भोयर, शिक्षक भारतीचे दिलीप निंभोरकर, शिक्षक परिषदेचे राजकुमार बोनकिले, शिक्षक संघर्ष संघटनेच्या संगीता शिंदे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रकाश काळबांडे, शिक्षक संघाचे अ‍ॅड. किरण सरनाईक, पश्चिम विमाशिसंचे विकास सावरकर, महाराष्ट्र शिक्षक आघाडीचे प्रा. नीलेश गावंडे उतरले आहेत. या सर्वांना त्यांच्या संघटनेकडून उमेदवारीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे.

शिक्षक मतदारसंघाचा कार्यक्रम लागू होईपर्यंत शिक्षकांची नोंदणी सुरू राहणार आहे; परंतु आता कोरोनामुळे मतदारसंघाची निवडणूक लांबणीवर पडणार आहे. शाळा, महाविद्यालयांना सुट्या लागल्यामुळे मतदारांसोबतच संपर्क तुटला आहे. निवडणूक आयोग काय निर्णय घेतो, याकडे उमेदवार लक्ष देऊन आहेत.-प्रा. डॉ. अविनाश बोर्डे, प्रांताध्यक्ष, विज्युक्टा.

 

टॅग्स :AkolaअकोलाElectionनिवडणूकTeacherशिक्षक