शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

गावठी दारू अड्डय़ांवर छापा; ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

By admin | Updated: November 29, 2014 01:11 IST

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

पिंजर (अकोला) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अकोला येथील भरारी पथकाने बाश्रीटाकळी तालुक्यातील राजंदा, वरखेड, वाघजाळी आणि मोर्णा नदीकाठी सुरू असलेल्या अवैध गावठी दारू गाळण्याच्या अड्डय़ांवर छापा टाकून ३१ हजार ८५0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. २७ नोव्हेंबर रोजी झालेल्या या कारवाईमुळे बाश्रीटाकळी तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, बाश्रीटाकळी तालुक्यातील काही गावांमध्ये तसेच मोर्णा नदीकाठी गावठी दारू गाळण्याचे अड्डे बिनबोभाट सुरू असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अकोला येथील पथकास मिळाली होती. भरारी पथकाने गुरुवारी राजंदा, वरखेड, वाघजाळी व मोर्णा नदीकाठावरील दारू अड्डय़ांवर छापे घातले. पथकाच्या कारवाईची चाहूल लागताच या ठिकाणाहून दारू गाळणारे पळून जाण्यात यशस्वी ठरले. तथापि, या पथकाने १५ लिटर क्षमतेचे ९0 पिंप, १३७५ लिटर मोह सडवा, २५ लिटर गावठी दारू व दारु गाळण्यासाठी लागणारे साहित्य असा एकून ३१ हजार ८५0 रुपयांचा मुद्देमाल येथून जप्त केला. याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक आर. के. फुसे, दुय्यम निरीक्षक आर. डी. पाटणे, पी. टी. धांडे, सहायक निरीक्षक व्ही. आर. बरडे, संतोष सोनोने, विशाल बांबलकर, सोमेश्‍वर जाधव, कोमल शिंदे आणि बबिता गवळी या अधिकार्‍यांनी केली.