शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पोळ्यावर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: August 21, 2014 00:55 IST

पावसाळा अत्यल्प झाला असल्याने खरीप हंगामात शेतकर्‍यांना प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागणार आहे.

अकोला : यावर्षी पावसाळा अत्यल्प झाला असल्याने खरीप हंगामात शेतकर्‍यांना प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे सध्या ग्रामीण भागात मरणासन्न वातावरण आहे. जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती असल्यामुळे पोळा सणावर विरजण पडले आहे. बैलांना सजविण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याने बाजारपेठ सजली असली; तरी शेतकर्‍यांची गर्दी दिसत नाही. २५ ऑगस्ट रोजी पोळा सण असून, बैलांना सजविण्यासाठी लागणार्‍या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. शहरातील गांधी चौक परिसरातील दुकानांमध्ये बैलांच्या गळ्यात घंटी व पट्टा, नाथा, रोठे, दोर, हार, झुला, रंग, चराटं विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. मात्र, या दुकानांकडे शेतकरी फिरकताना दिसत नाही. जिल्ह्यात सरासरीच्या अर्धाही पाऊस झाला नसल्याने अध्र्या अधिक शेतकर्‍यांनी पेरणीच केली नाही, तर ज्या शेतकर्‍यांनी पेरणी केली त्यांची पेरणी उलटली. यावर्षी उत्पादनात प्रचंड घट येणार असल्याचे चित्र दिसत असल्यामुळे ग्रामीण भागात निराशाजनक वातावरण आहे. याचा सरळ परिणाम पोळा सणावर पडला आहे. बैलांना सजविण्यासाठी तसेच रंगरंगोटी करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी दरवर्षी शेतकरी दुकानांमध्ये गर्दी करतात. यावर्षी ग्रामीण भागात निराशाजनक वातावरण असल्यामुळे बाजारपेठेत गर्दी दिसत नाही.