शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या धामधुमीत अडकले दुष्काळी मदतीचे वाटप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 12:17 IST

दुष्काळी मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- संतोष येलकरअकोला : गतवर्षी दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांना चौथ्या टप्प्यातील दुष्काळी मदत वाटप करण्यासाठी ६१ कोटी ४९ लाख ७५ हजार रुपयांचा मदत निधी महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील पाच तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आला असला तरी, विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत दुष्काळी मदतीचे वाटप अडकले आहेत. त्यामुळे दुष्काळी मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गतवर्षी शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या पहिल्या यादीत अकोला जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १९९ कोटी रुपये मदत निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार शासनामार्फत तीन टप्प्यांत १३७ कोटी ६१ लाख २ हजार ४५६ रुपयांचा मदत निधी प्राप्त झाला होता. उपलब्ध दुष्काळी मदत दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. उर्वरित चौथ्या टप्प्यातील ६१ कोटी ४९ लाख ७५ हजार रुपयांची दुष्काळी मदत १० सप्टेंबर रोजी शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली. उपलब्ध मदत १३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर या पाचही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली. मदत निधी वितरित करण्यात आला असला तरी, विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने, दुष्काळी मदतीची रक्कम पाचही तालुक्यांतील शेतकºयांच्या बँक खात्यात अद्याप जमा झाली नाही. त्यामुळे दुष्काळी मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तालुकानिहाय अशी वितरित करण्यात आली मदत!जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शेतकºयांसाठी ६१ कोटी ४९ लाख ७५ हजार रुपयांची दुष्काळी मदत संबंधित तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली. त्यामध्ये अकोला तालुका-१६ कोटी २५ लाख ७ हजार ५१७ रुपये, बार्शीटाकळी तालुका-१० कोटी १३ लाख ३१ हजार २७४ रुपये, तेल्हारा तालुका-९ कोटी ५९ लाख १२ हजार ७९७ रुपये, बाळापूर तालुका-१२ कोटी ५१ लाख ९१ हजार २४५ रुपये व मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकºयांसाठी १२ कोटी ९९ लाख ६४ हजार ५१४ रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे.

 

दुष्काळी मदतीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यासाठी शेतकºयांच्या याद्या आणि मदत निधीचे धनादेश संबंधित बँकांमध्ये जमा करण्यात आले आहेत. मदतीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.-विजय लोखंडे,तहसीलदार, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019