शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ पुजला पाचवीलाच!

By admin | Updated: January 3, 2015 01:29 IST

केळी, संत्रा बागा झोपल्या, भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान.

विवेक चांदूरकर / अकोलाअकोला : एक वर्षापासून दुष्काळ जणू शेतकर्‍यांच्या पाचवीलाच पुजला आहे. गत दोन दिवस झालेल्या अवकाळी अतवृष्टीने आधीच गलितगात्र झालेल्या शेतकर्‍यांचे कंबरडेच मोडले असून, कशातरी तग धरून असलेल्या केळी, संत्रांच्या फळबागा व भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावर्षीचा खरीप व रब्बी हंगाम हातचा गेल्यानंतर या पावसामुळे उरले सुरले पिकाचेही नुकसान झाले आहे. गत वर्षी खरीप हंगामावेळी शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहत होते. मात्र, आवश्यकता असताना पाऊस आला नाही. परिणामी खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग, कपाशी पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट आली. कोरडवाहू शेतकर्‍यांचा तर लागवडीचाही खर्च निघाला नसून, दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. वर्‍हाडातील ६0 ते ७0 टक्के शेतकर्‍यांना खरीप हंगामात तर फटका बसलाच, मात्र परतीचाही पाऊस न आल्याने रब्बी हंगामातही पेरणी करता आली नाही. त्यानंतर कमी प्रमाणात का होईना, शेतकर्‍यांनी रब्बी हंगामात हरभरा, गहू पिकांची पेरणी केली.ओलिताची सोय असलेल्या शेतकर्‍यांनी कमी पाण्यातही केळी व संत्र्यांच्या फळबागा जगविल्या. भाजीपाल्याचे पीक घेण्याचा प्रयत्न करीत असतानाच जणू शेतकर्‍यांच्या उण्यावर टिपून असलेला पाऊस धडकला. दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे संत्रा व केळी या फळबागा व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.केळीच्या बागा झोपल्या असून, संत्री गळून पडली आहेत. तेल्हारा, पातूर, आकोट तालुक्यातील पणज भागातील, केळी व संत्रा फळबागांचे नुकसान झाले. तसेच शेतात पाणी साचल्याने भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यात आकोट, पातूर- नंदापूर, बाश्रीटाकळी, अकोला तालुक्यातील चांदूर या भागात भाजीपाल्याचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.भाजीपाल्यासोबतच लाखो हेक्टरवरील कपाशीची झाडे काळी पडली असून, झोपली आहेत. कपाशीची बोंडेही ओली होऊन खाली पडली. तसेच दोन दिवस संततधारमुळे तुरीच्या शेंगामधील दाणे फुगले असून, शेंगा काळ्या पडल्या आहेत. त्यामुळे उत्पादनाची थोडी आस असलेली कपाशी व तुरीचेही नुकसान झाले आहे.