शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

शास्तीच्या देयकांना ‘ब्रेक’ लावण्याची ओढविली नामुष्की!

By admin | Updated: December 23, 2014 00:51 IST

अकोला मनपाच्या कर विभागाने कार्यवाही थांबविली.

आशिष गावंडे/अकोलामालमत्तेचे भोगवटा प्रमाणपत्र सादर करा अन्यथा दंडात्मक शास्ती कर आकारणीला सामोरे जाण्याच्या उद्देशातून महापालिकेच्या कर विभागाने शास्तीची देयके वाटण्याचा सपाटा लावला. शहरातील हॉटेल व्यावसायिक, लॉजधारक, खासगी रुग्णालये तसेच कर्मशियल कॉम्प्लेक्सच्या जवळपास ७00 मालमत्ताधारकांना देयकांची खिरापत वाटली. मुळात, शास्ती आकारणीचा विषय मालमत्ता कर विभागाच्या अखत्यारित येत नसल्याची जाणीव झाल्यानंतर शास्तीच्या देयक वाटपाला ह्यब्रेकह्ण लावण्याची नामुष्की या विभागावर ओढविली.शहरातील मालमत्ताधारकांचे भोगवटा प्रमाणपत्र तपासून प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यांना मालमत्तेवर दुप्पट दंड आकारून शास्ती कर लागू करण्याचे निर्देश सहा महिन्यांपूर्वी मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी मालमत्ता कर विभागाला दिले होते. त्यानुषंगाने मालमत्ता कर विभाग व नगर रचना विभागाने शहरातील मोठी वाणिज्य संकुल, खासगी रुग्णालये, हॉटेल व लॉज व्यावसायिकांच्या इमारतींचे मोजमाप केले. यावेळी संबंधित मालमत्ताधारकाने नियमापेक्षा जास्त बांधकाम केल्याचे समोर आल्यानंतर मालमत्ता कर विभागाने सरसकट जवळपास ७00 मालमत्ताधारकांना शास्तीचे देयक सादर केले. यामध्ये मालमत्ता करावर दुप्पट दंड आकारण्याची तरतूद आहे. शास्तीनुसार आकारली जाणारी दंडात्मक रक्कम लक्षात येताच, अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली. मनपाच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशातून प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली असली, तरी लाखो रुपयांचा दंड जमा करणार्‍या मालमत्ताधारकांनी न्यायालयात धाव घेतली. यावेळी शास्तीची नोटीस व त्यानंतर देयकाची नोटीस बजावण्याचे अधिकार मालमत्ता कर विभागाला नसून, ही बाब नगर रचना विभागाच्या अखत्यारितील असल्याची माहिती उजेडात आली. नियमांची जाणीव करून देणार्‍या प्रशासनाला स्वत:ची चूक उमगताच शास्तीच्या देयकांना ह्यब्रेकह्ण लावण्याचा निर्णय मनपाच्या कर विभागाला घ्यावा लागला. या प्रकारामुळे संतप्त मालमत्ताधारक आता मालमत्ता कर सुद्धा जमा करण्यास नकार देत असल्याची माहिती आहे.